- मेहमूद शेख
वाळूज महानगर : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने भरधाव कार ट्रॅक्टरवर धडकली. या भीषण अपघातात कार चालकाचा अर्धे शीर धडावेगळे होऊन जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील तिसगाव चौफुलीवर घडला.
सोलापूर-धुळे महामार्गावर रस्त्याच्या बाजुला संरक्षक लोखंडी गार्ड बसविण्याचे काम सुरु आहे. आज बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.२०, जी.ई.१०८५) चा चालक हा ट्रॉलीमध्ये लोखंडी गार्ड भरुन साजापूरकडून ए.एस.क्लबच्या दिशेने चालला होता. भरधाव वेगातील ट्रॉलीचे पाठीमागील दोन्ही चाक निखळ्याने ट्रॅक्टरचे नियंत्रण बिघडले. याचवेळी पाठीमागुन भरधाव येणारी कार (क्रमांक एम.एच.२०, सी.एस.०५०४) ट्रॉलीवर जाऊन धडकली. त्यामुळे ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्यावरच उलटले. यातच ट्रॉलीमधील लोखंडी गार्ड खाली येऊन कारच्या काचेतून चालकाच्या डोक्यात शिरले. यामुळे कारचालकाचे अर्धे शिर धडावेगळे झाले.
वाहनचालक आणि नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. डी. अधाणे, पोना.नवीद खान, पोकॉ. मंगेश मनोरे, पोकॉ.युसुफ शेख, पोकॉ. हरिकराम वाघ व वाहतुक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरिक्षक शंकर शिरसाट, आढाव, सहा.फौजदार गायकवाड, पोेहेकॉ. इम्रान अख्तर आदींनी अपघातस्थळी धाव घेतली.
कारचालकाचे अर्धे शीर धडावेगळेट्रॉलीमधील लोखंडी गार्ड काचेतून आत शिरल्याने कारचालकाचे अर्धे शिर धडावेगळे झाले. दरम्यान, कारचा दरवाजा लॉक झाल्याने मोठ्या प्रयत्नाने दरवाजा तोडून चालकाचा मृतदेह कारबाहेर काढण्यात आला. कारचालकाचे अर्धे शिर धडावेगळे झाल्याने ओळख पटविण्यात अडचण आली. मात्र, चालकाजवळ ओळखपत्र मिळाले, यावरून चालकाचे नाव रोहिदास पाटीलबा उशीर (५६, रा.ठाकरेनगर, एन-२, औरंगाबाद) असे स्पष्ट झाले.