छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून रेशन दुकानात ज्वारीही मिळणार आहे. असा निर्णय झाला असला तरी अद्याप याबाबत काहीही सूचना शासनस्तरावरून प्रशासनाला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे रेशनवर कार्डधारकांना ज्वारी मिळण्यास वाट पहावी लागणार आहे. सध्या अंत्योदय, केशरी, शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य दिले जाते.
रेशनवर सध्या काय आणि किती धान्य मिळते?पिवळे कार्डधारक : गहू २३ किलो, तांदूळ १२ किलो प्रति कार्डकेशरी कार्डधारक : गहू ३ किलो, तांदूळ २ किलो प्रति व्यक्तीशेतकरी कार्डधारक : गहू ३ किलो, तांदूळ २ किलो प्रति व्यक्ती
केव्हापासून ज्वारी मिळणार...नोव्हेंबरपासून ज्वारी मिळेल, याबाबत सध्या शासकीय सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे नोव्हेंबरपासून ज्वारीचे वितरण होईल. पण थोडा विलंब होईल, असे सांगितले जात आहे.
कार्डधारक किती?तालुका ... ......... अंत्योदय.......प्राधान्य कुटुंबअ.धा.वि.अ. ...........३३०३९.....७३१७८छत्रपती संभाजीनगर ....२१३८....५६६६४फुलंब्री ...२२६०.....२३७१६सिल्लोड ...४६२७.....४३६८८सोयगाव ...२५७४.....१८६८५कन्नड ...५०८९.....४९७२१खुलताबाद ...१८२२....१७७६६वैजापूर ....४३७३....४७६८५गंगापूर ...३५४७.....४६५५७पैठण ...६६३६....४६९६४एकूण ....६६१०५....४२४६२४
शासनाकडून पुरवठा होताच वाटप...शासनाकडून पुरवठा होताच वाटप सुरू होईल. धान्य वितरणासाठी बायोमेट्रिक प्रक्रिया जिल्ह्यातील १८०२ रेशन दुकानांवर राबवली जाते.- जिल्हा पुरवठा विभाग