शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

लातुरात कॅरीबॅग बंदीचा फज्जा

By admin | Published: May 22, 2017 12:03 AM

लातूर : कॅरीबॅग मुक्त योजनेचा लातूर शहरात फज्जा उडाला असून, कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : कॅरीबॅग मुक्त योजनेचा लातूर शहरात फज्जा उडाला असून, कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे. कॅरीबॅग वापरासंबंधी कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांकडे खुलेआम कॅरीबॅगचा वापर होत आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात कॅरीबॅग वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र लातूर शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे. भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, हॉटेल चालक आदी जणांकडे ग्राहकांना कॅरिबॅग दिल्या जातात. ५० मायक्रॉनच्या आतील कॅरीबॅग खुलेआम वापरल्या जात आहेत. सध्या लग्नसराई सुरू असून लातूर शहरात यंदा मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे विविध मंगल कार्यालयात पार पडत असताना लग्नात अनिवार्य झालेले प्लास्टिक पाणीचे ग्लास, चहाचे ग्लास, वाटी, द्रोण, पत्रावळी आदी प्रकार खुलेआम वापरले जात आहेत. वास्तविक पाहता या वापरालाही बंदीे आहे. कॅरीबॅग बंदी करण्याचे जर लातूर प्रशासनाने मनावर घेतले तर शहर प्रदूषणमुक्त होऊन पर्यावरण पूरक होईल, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. मात्र मनपा प्रशासनकडून कसलीही कारवाई होत नाही. प्रारंभीच्या काळात बंदी आदेश आल्यानंतर विक्रेत्यांकडील कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. काही दिवस कॅरिबॅगचा वापर पूर्णत: बंद झाला होता. मात्र आता मोहीम बंद झाल्याने कॅरिबॅगचा सर्रास वापर सुरू आहे. शहरातील ठिकठिकाणच्या नाल्यांमध्ये कॅरिबॅग व प्लास्टीकच्या वस्तू पडल्या आहेत. या वस्तूंमुळे नाल्याही तुंबलेल्या आहेत. यामुळे पर्यावरण संतुलनाची पुरती वाट लागली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या कॅरिबॅग शहरात जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे मोकाट जनावरे या कॅरिबॅग्ज खात असल्याचेही दृश्य शहरात दिसते. तरीही प्रशासन मोहीम राबवीत नाही.