शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
7
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
8
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
9
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
10
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
11
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
12
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
13
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
14
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
15
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
16
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
17
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
18
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
19
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
20
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी फौजदारासह खाजगी व्यक्ती जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:51 PM

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून खाजगी व्यक्तीमार्फत ३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याविषयी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ठळक मुद्देगंगापूर येथे सापळा रचून कारवाई : तक्रारदाराला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी घेतली लाच

औरंगाबाद : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून खाजगी व्यक्तीमार्फत ३० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याविषयी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.फौजदार गजेंद्र तुळशीराम इंगळे आणि खाजगी व्यक्ती समीर नासीर पठाण (२९, रा. मन्सुरी कॉलनी, गंगापूर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत फौजदार इंगळे यांनी एका प्रकरणात चौकशीसाठी तक्रारदारला २८ जून रोजी ठाण्यात बोलावले होते. तक्रारदार ठाण्यात गेले तेव्हा त्यांनी संबंधित प्रकरणात आरोपी न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराला ३० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी इंगळेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार ३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन सरकारी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा फौजदार इंगळे यांनी तक्रारदाराकडे पुन्हा लाचेची रक्कम मागून ही रक्कम समीर पठाणकडे देण्याचे सांगितले. तेथे उपस्थित असलेल्या पठाणने लाचेची रक्कम घेण्याची तयारी दर्शविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साध्या वेशातील अधिकारी, कर्मचाºयांनी पोलीस ठाण्याजवळील न्यू जनता हॉटेलसमोर सापळा रचला. फौजदार इंगळे यांनी सांगितल्यानुसार समीर तेथे आला आणि त्याने लाचेचे ३० हजार रुपये तक्रारदाराकडून घेतले. समीरने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला लाचेच्या रकमेसह पकडले. यानंतर लगेच गंगापूर ठाण्यातून फौजदार इंगळे यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, उपअधीक्षक सुजय घाटगे, कर्मचारी संदीप आव्हाळे, भीमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, संतोष जोशी यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग