औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचे पडसाद नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना नागपूरला बोलावले आहे. परीक्षा विभागातील अधिकारी रातोरात नागपुरात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विद्यापीठाच्या आंधळ्या कारभाराचा जाब सरकारला विचारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय इतरही सदस्यांनी सभागृहात हा मुद्दा मांडण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठ प्रशासनाकडे या प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागितला. हा खुलासा घेऊन अधिकारी नागपूरला रवाना होत आहेत.
२६४ अभ्यासक्रमांच्या ६५ हजार पदव्यांची छपाईविद्यापीठ प्रशासनाने रविवारी सुटीच्या दिवशीही दिवसभर कामकाज केले. कागदपत्रांची पडताळणी, तांत्रिक चुका शोधण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटना, घडामोडींची माहिती देण्यासाठी कुलगुरूंसह अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात विद्यापीठाच्या २६४ अभ्यासक्रमांच्या ६५ हजार २०७ पदवी प्रमाणपत्रांची छपाई संंबंधित कंपनीकडून केले आहे.