शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

जातीचे जोखड उतरवा

By admin | Published: April 23, 2016 1:08 AM

विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापुरुष तसेच राजकीय नेत्यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्याचे फॅड कमी होण्याचे नाव घेत नाही.

विजय सरवदे, औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापुरुष तसेच राजकीय नेत्यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्याचे फॅड कमी होण्याचे नाव घेत नाही. अगोदरच विद्यापीठात तब्बल १३ अध्यासने कार्यरत असताना त्यात आणखी नव्याने ५ केंद्रांची भर पडणार आहे. विशेष म्हणजे ज्या महापुरुषांच्या नावे अध्यासने आहेत, त्याच महापुरुषांच्या जातीच्या संचालकांची वर्णी अध्यासनावर लावण्यात आलेली आहे. जातीच्या जोखडातून ही अध्यासने मुक्त करावीत, अशी मागणी होत आहे. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणत्याच कुलगुरूंनी निर्णय घेतलेला नाही.राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत व त्यांच्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, गौतम बुद्ध, वसंतराव नाईक, बाळासाहेब पवार, शाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, ताराबाई शिंदे, शहीद भगतसिंग आणि ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, अशा १३ अध्यासनांचा समावेश आहे. या अध्यासनांचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी विद्यापीठ दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करते; पण संचालकांनी स्वत:चे मानधन उचलण्यापलीकडे ठळक असे कार्य केलेले दिसत नाही. केवळ संबंधित महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यापलीकडे अध्यासनांचे फारसे काम नाही.मागील २५ वर्षांपूर्वीपासून महात्मा फुले अध्यासन केंद्र कार्यरत आहे. या केंद्राचे तेवढे भरीव योगदान राहिलेले आहे. पा. बा. सावंत हे या अध्यासन केंद्राचे संस्थापक संचालक होते. त्यानंतर प्रा. बा. ह. कल्याणकर यांनी या अध्यासन केंद्राची धुरा सांभाळली.बा. ह. कल्याणकर व पा. बा. सावंत यांनी या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. त्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात वसंतराव नाईक व मौलाना आझाद अध्यासन केंद्र सोडले तर तब्बल ९ अध्यासन केंद्रांची विद्यापीठात भर पडली. अर्थसंकल्पात या अध्यासन केंद्रांसाठी प्रती वर्ष १ लाख रुपये याप्रमाणे पहिली पाच वर्षे तरतूद केली होती. म. फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, मौलाना आझाद आणि ताराबाई शिंदे या अध्यासन केंद्रांव्यतिरिक्त अन्य केंद्रांनी मात्र ना प्रबोधनाचे काम केले, ना संशोधनाचे. कुलगुरूंसमोर चौकट मोडण्याचे आव्हानविद्यमान कुलगुरू डॉ. बी. एच. चोपडे यांच्यासमोर अध्यासनांच्या संचालकांची फेररचना करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंग या दोन अध्यासनांना जातीचे संचालक सापडलेले नाहीत.उर्वरित ११ अध्यासने मात्र, ज्या महापुरुषांच्या नावे आहेत, त्या अध्यासनावर संबंधित महापुरुषांच्या जातीचाच संचालक नेमण्यात आला आहे. विद्यार्थी संघटना किंवा अन्य काही मार्गाने विद्यापीठाकडे मागणी आल्यामुळे नवीन अध्यासनांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये गोपीनाथ मुंडे सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट सेंटर, विलासराव देशमुख अध्यासन केंद्र, यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र, उस्मानाबाद येथे विद्यापीठ उपकेंद्राच्या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील अध्यासन केंद्र, गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रांचा समावेश आहे. यापैकी गोपीनाथ मुंडे यांच्या नावे सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासन केंद्रासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात ५ लाख रुपयांची तरतूदही करून ठेवली आहे.