केवळ संक्रांतीच्या काळातच नव्हे, तर वर्षभर मांजामुळे अडकून जायबंदी होणाऱ्या पक्ष्यांचे सत्र सुरू असते. नायलॉन मांजाला काचेची पुड लावण्यात येत असल्याने त्याची धार वर्षानुवर्षे कमी होत नाही. त्यामुळे वर्षभर अशा घटना सुरूच असतात, फक्त संक्रांतीच्या काळात त्याचे प्रमाण वाढलेले असते, असे पक्षीमित्रांनी सांगितले.
चौकट :
मांजामुळे फुलपाखरे, सरडे, खार यांनाही जीव गमवावा लागतो. उपचारासाठी जे पक्षी आणले जातात, त्यांच्यापैकी ६० टक्के पक्षी पुन्हा चांगले होतात; परंतु उर्वरित पक्ष्यांना गंभीर इजा झाल्यामुळे जीव गमवावा लागतो. मांजामुळे ज्या पक्ष्यांचे पंख छाटले जातात, त्यांचे उडणे कायमचे बंद होते आणि ते काही दिवसांतच कुणा अन्य प्राण्यांचे भक्ष्य ठरतात.
चाैकट :
संक्रांतीच्या आधी आणि नंतरचे ४-५ दिवस मांजामुळे जखमी होणारे पक्षी मोठ्या प्रमाणात सापडतात. उंच झाडावर कुठे तरी मांजा अडकलेला असतो. त्यामुळे त्या मांजात अडकणारा पक्षी जर आकाराने मोठा असेल तर तो इतरांना दिसतो आणि त्याची त्यापासून सुटका केली जाते; पण आकाराने लहान असणारे पक्षी मात्र सहजासहजी कुणाला दिसतही नाहीत आणि त्यांची ताकदही कमी पडते, त्यामुळे त्यांना लगेचच जीव गमवावा लागतो. दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या पक्ष्यांपैकी ८० टक्के पक्षी हे मांजामुळे जखमी झालेले असतात.
- डॉ. किशोर पाठक
पक्षीमित्र
फोटो ओळ :
उपचारासाठी आणण्यात आलेले जखमी घुबड.