गेल्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने शिवना टाकळी प्रकल्पात अजूनही १८ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली आहे. यंदा ऊस लागवडीभर दिला आहे. यामुळे हिंस्र प्राण्यांना लपायला जागा मिळत असल्याने शेतकरी अगोदरच त्रस्त आहेत. त्यात नुकतेच उगवलेल्या मका, कापूस, सोयाबीन, अद्रक अशा कोवळ्या पिकांना रानडुकरे रात्रीच्या वेळी उद्ध्वस्त करीत आहेत. यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी अटोकाट प्रयत्न करीत आहेत. अगोदरच पाऊस नसल्याने संकट कोसळले आहे, त्यात तग धरून असलेल्या पिकांना रानडुकरे फस्त करीत असल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. तलाठ्यांनी अशा नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच वनविभागाने हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पं.स. सदस्य किशोर पवार यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
070721\20210707_083345-01.jpeg
हतनूर शिवारात रानडुकराने मुकुंद पवार यांच्या गट नं. ८८ मध्ये केलेले अद्रक पिकाचे नुकसान..
छाया :- संदीप शिंदे