शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

सावधान, कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 1:22 PM

corona virus patients increases in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ३४८ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देदिवसभरात जिल्ह्यामध्ये ६८ रुग्णांची वाढसध्या २३४ रुग्णांवर सुरू उपचार आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने खबरदारीचे पाऊल उचलण्याची गरज आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ६८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर २९ जण कोरोनामुक्त झाले. जालना जिल्ह्यातील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ३४८ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६८ रुग्णांत मनपा हद्दीतील ६०, तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १९ आणि ग्रामीण भागातील १०, अशा एकूण २९ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. जालना जिल्ह्यातील ५७ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

१२ दिवसांत उपचार घेणाऱ्यांची संख्या दुप्पटजिल्ह्यात २८ जानेवारी रोजी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९१ होती. तब्बल ११ महिन्यांनंतर उपचार घेणाऱ्यांची संख्या ९१ वर आली होती. मात्र, अवघ्या १२ दिवसांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३४ वर गेली आहे.

मनपा हद्दीतील रुग्णप्रकाशनगर १, समर्थनगर १, शिवशक्ती कॉलनी १, छावणी ४, दुर्गा रोड परिसर १, स्वप्ननगरी १, एन - ७, सिडको ७, सिग्मा हॉस्पिटल परिसर १, संजय हौ. सो. २, सिडको एन-६ येथे २, एन-१, ब्लू बेल्स सोसायटी १, सातारा परिसर १, कांचनवाडी १, म्हाडा कॉलनी १, मयूर पार्क १, एन-५, सिडको १, एन-९, सिडको १, सिध्दार्थनगर, हडको १, एन-१, सिडको २, चिकलठाणा १, बीड बायपास परिसर १, चौधरी हेरिटेज, रेणुकामाता कमान २, जटवाडा रोड परिसर २, टीव्ही सेंटर, हडको १, मल्हार चौक १, एन-४, सिडको १, मुकुंदवाडी २, बन्सीलालनगर १, म्हाडा कॉलनी २, वेदांतनगर १, अन्य १४

ग्रामीण भागातील रुग्णपानवडोद, सिल्लोड १, वडगाव १, रांजणगाव शेणपुंजी १, लासूर स्टेशन १, अन्य ४.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद