शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

सातारा बायपासवरील सीसीटीव्ही बंद; देखभालीकडे होत आहे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:59 PM

सातारा बीड बायपासवर लोकवर्गणीतून बसविलेल्या सीसीटीव्हीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ‘तिसरा डोळा’ बंद पडले आहेत.

ठळक मुद्देसातारा-देवळाई हा परिसर शहरात समाविष्ट झाला असला तरी त्या परिसराला सतत सापत्न वागणूक दिली जात आहे.महानगरपालिका प्रथम सेवासुविधा शहरातील इतर वॉर्डांत पुरविते त्यानंतर सातारा-देवळाई वॉर्डाचा विचार केला जातो.

औरंगाबाद : सातारा बीड बायपासवर लोकवर्गणीतून बसविलेल्या सीसीटीव्हीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ‘तिसरा डोळा’ बंद पडले आहेत. नुकतेच शहरात विशेष गुणवत्तेचे नवीन कॅमेरे बसविले; परंतु आयुक्तालयाचीच हद्द असताना बायपास मात्र वंचित ठेवला आहे.

सातारा-देवळाई हा परिसर शहरात समाविष्ट झाला असला तरी त्या परिसराला सतत सापत्न वागणूक दिली जात आहे. महानगरपालिका प्रथम सेवासुविधा शहरातील इतर वॉर्डांत पुरविते त्यानंतर सातारा-देवळाई वॉर्डाचा विचार केला जातो. मनपाकडे कर अदा करणाऱ्यांत परिसराचा आग्रक्रम आहे तरीदेखील प्रत्येक बाबतीत दुर्लक्षपणाचाच कळस ठरलेला आहे. येथे रस्ते, पाणी, दिवे, सफाई इतर सेवासुविधांसाठी संघर्ष केल्याशिवाय काहीही हाती मिळत नाही. 

शहरातील वाहतूक बायपास रस्त्यावर वळविल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे.  महानुभाव आश्रम पैठणरोड ते देवळाई चौक या दरम्यान बसविण्यात आलेले १६ सीसीटीव्ही देखभालीअभावी बंद पडले आहेत. काही सीसीटीव्हीच्या तारा अपघाताने तुटल्या त्याची जोडणीच करण्यात आलेली नाही, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ देखभालच करण्यात आली.  बंद पडलेल्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यावर  भर दिलेला नाही. 

जनता दरबारात लोकसहभागतत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सातारा येथे घेतलेल्या जनता दरबारात नवीन सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आला होता. वाहतूक शाखेने रस्ते सुरक्षेवर घेतलेल्या व्यापारी असोसिएशनच्या बैठकीतही वाहनावर नियंत्रण, वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी लोकसहभागातून नवीन सीसीटीव्ही पुन्हा कार्यान्वित करण्याचे एकमुखी ठरले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. 

नवीन बसविण्याची गरज२०१३ मध्ये सातारा परिसरात सीसीटीव्ही बसविल्याने गुन्हेगारी, वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते; परंतु कालांतराने, अपघाताने नुकसान, तसेच देखरेखीकडे लक्ष न दिल्याने तिसरा डोळा शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. याविषयी स्थानिक पोलीस निरीक्षक भारत काकडे यांच्याशी संपर्क साधला असता नव्याने सीसीटीव्ही बसविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसcctvसीसीटीव्ही