शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

‘सीसीटीव्ही’, सुरक्षारक्षक असूनही सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:28 AM

घाटी रुग्णालय आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांसह सुरक्षारक्षक तैनात आहेत. तरीही या दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वाºयावर असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांतील घटनांनी आला. या दोन घटनांमुळे किमान यापुढे खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांक डून व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालय आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांसह सुरक्षारक्षक तैनात आहेत. तरीही या दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वाºयावर असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांतील घटनांनी आला. या दोन घटनांमुळे किमान यापुढे खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांक डून व्यक्त होत आहे.एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच शनिवारी खळबळ उडाली. छावणीतील लोखंडी पुलावर बस अडवून कर्णपुरा येथील मैदानावर नेण्यात आली.बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकाने बसमधील प्रत्येक प्रवाशासह बसची कसून तपासणी केली, तेव्हा बॉम्बची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.कर्णपुरा येथे बसच्या तपासणीत काहीही नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन अन्य शिवनेरी आणि अश्वमेध बसची तपासणी केली. ही घटना होत नाही तोच दुसºया दिवशी रविवारी घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या कार्यालयाशेजारी आढळलेल्या बेवारस वस्तूने दुपारी खळबळ उडाली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने घाटीत जाऊन त्या वस्तूची तपासणी केली. या दोन्ही घटनांनी सुरक्षाव्यवस्थेचे पितळ उघडे पडले.घाटीत १३४ ‘कॅमेरे’, १२४ सुरक्षारक्षकघाटी रुग्णालयाच्या परिसरात १३४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर १२४ सुरक्षारक्षक आहेत. या संख्येमुळे घाटी रुग्णालयावर करडी नजर असल्याचे दिसते; परंतु रविवारच्या घटनेने ‘कोणीही या आणि काहीही ठेवून जा’ अशीच परिस्थिती दिसत आहे.बसस्थानकात ९ सीसीटीव्ही, १३ सुरक्षारक्षकमध्यवर्ती बसस्थानकात ९ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर १३ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. यामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे समजते. सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या अखत्यारीत असून, एसटी महामंडळातर्फे लवकरच २७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शिवनेरी बसमध्येही सीसीटीव्ही कॅमेरा असतो.बसस्थानकात दररोज सातशेपेक्षा अधिक बसेस आणि २० ते २५ हजार प्रवाशांची ये-जा.च्घाटीतील ‘ओपीडी’त दररोज १५०० ते २००० रुग्णांची नोंद.सतर्क राहण्याच्या सूचनारविवारची घटना ही सुरक्षारक्षकांमुळेच समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयात कार्यरत सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ सूचीत करण्याचे सांगितले आहे.-डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटीयोग्य खबरदारीमध्यवर्ती बसस्थानकात १३ सुरक्षारक्षक असून, एका शिफ्टमध्ये चार सुरक्षारक्षक कार्यरत असतात. त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर नवीन काही सूचना प्राप्त झालेली नाही.-स्वप्नील धनाड, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ), मध्यवर्ती बसस्थानक