वाळुज महानगर: औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवणार असून, तिरंगा चौकापासून ते सीएट कंपनीपर्यंत एमआयडीसी ने रंगरंगोटी व वाहतुकीस अडथळा ठरणारे झाडेझुडपे कटाईचे काम हाती घेतलेले दिसत आहे. व्हिजिटर्सच्या स्वागतासाठी तिरंगा चौकात स्वागत कमान उभारण्याचे प्रयोजन झाले आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये देश विदेशातील उद्योजक सातत्याने व्हिजिटर्स येतात. प्रथमदर्शनी तिरंगा चौकापासून रमेश मोरे चौक आणि रांजणगाव सिएट कंपनीपर्यंत रस्त्याची चाळणी झालेली होती. परदेशी उद्योजक वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये भेट देताना त्यांना गैरसोयीचे वाटू नये तसेच त्याचा परिणाम येथील उद्योजकांवर होऊ नये म्हणून एमआयडीसीने रस्त्याचे सुशोभीकरण हाती घेतले आहे. देश प्रदेशामध्ये एमआयडीसी वाळूज क्षेत्रातील विविध कारखान्यात तयार झालेले उत्पादन एक्सपोर्ट होतो. त्यामुळे आजच्या घडीला एमआयडीसी परिसरामध्ये उत्पादन क्षमता रेग्युलर सुरू आहे. कारखान्यामध्येही कुशल कामगारांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामगारांना त्यांच्या हक्काची नोकरी टिकवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युनियनदेखील सातत्याने प्रयत्नशील आहेत. खासगीकरणाचा फटका बहुतांश हंगामी कामगाराला बसतो आहे त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही त्या कामगारांसाठी कौशल्य प्रशिक्षण चालविण्याचे ही प्रयोजन औद्योगिक संघटनेकडून करण्याचे प्रयोजन सध्या दिसत आहे.
गुणवत्तापूर्वक क्षेत्र करण्याचा उद्देशएमआयडीसी वाळूज परिसरामध्ये असलेल्या उद्योग क्षेत्रामध्ये चोऱ्या, मारहाण व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच कोणत्या सेक्टरमध्ये काय चालू आहे याची खबर तत्काळ पोलिस प्रशासन आणि विभागाला मिळावी यासाठी एमआयडीसी सोबत सीसीटीव्ही बसविण्याचे प्रयोजन आहे सध्या रंगरंगोटीचे काम त्यांनी हाती घेतलेले असून स्वागत कमानही ते उभारणार आहेत.- अनिल पाटील, अध्यक्ष मासिआ
बाराही महिने स्वच्छता असावीवाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवाळीनंतर कामाचा जोर पुन्हा वाढला आहे. नवीन ऑर्डर घेण्याचे प्रक्रियादेखील सुरू झाल्या आहेत. त्या दरम्यान औद्योगिक क्षेत्रामध्ये भेटीसाठी येणाऱ्यांना सुलभता व्हावी, सेक्टरनिहाय कारखाने त्वरित सापडावे यासाठी पाट्या रंगवणे, दिशादर्शक फलक लावणे परिसर रंगरंगोटी व सुशोभीकरण सुरू आहे. ही रंगरंगोटी व तेथील स्वच्छता कायम असावी जेणे करून याचा फायदा उद्योजकांना होईल.