औरंगाबाद : बायपासवरील चोऱ्या व अपघाताच्या घटना सातारा पोलिसांना तात्काळ कळाव्यात यासाठी सामाजिक सहभागातून तिसरा डोळा कार्यान्वित करण्यात आला होता; परंतु देखभालीअभावी या योजनेची वाट लागली असून, रस्त्यावर कॅमेऱ्याची लक्तरे लटकताना दिसत आहेत.
सेफ सिटी या उपक्रमात नव्याने २०० नवीन सीसीटीव्ही पूर्ण शहरात बसविण्याची संकल्पना पोलीस विभागाकडून मांडली जाते. महानुभाव चौक ते देवळाईपर्यंत १६ सीसीटीव्ही कॅमेरे होते, त्याची दुरुस्ती खाजगी एजन्सीमार्फत करण्यात येत होती; परंतु त्यांचे वायरिंग सर्किट तुटले आणि कॅमेऱ्याचे सांगाडेच फक्त खांबावर लटकलेले दिसत आहेत. ते सांगाडे पाहून अनेकांना सीसीटीव्ही असल्याचा भास होतो, प्रत्यक्षात बंद कॅमेऱ्यांसमोरून गुन्हेगार कित्येकदा गेले तरी त्याची खबर सातारा पोलीस ठाण्याला मिळणे शक्य नाही. या कॅमेऱ्याचे कनेक्शन थेट सातारा पोलीस ठाण्यात आहे.
वाहतूक चौकीसमोरच तुटलेले कॅमेरेदेवळाई वाहतूक चौकीसमोरच तुटलेले कॅमेरे पाहावयास मिळत असून, वाहतूक शाखेलादेखील याची चिंता नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाकडून मोबाईलवर फोटो काढून आॅनलाईन पावती किंवा ई-चालान वसूल केले जात आहे. त्यामुळेच दुर्लक्ष होत आहे की काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.रस्त्यावर सुसाट जाणाऱ्या वाहनांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा धाक निर्माण होऊ शकतो. त्याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.
नादुरुस्त कॅमेरे काढून नवीन बसविणारबायपासवरील नादुरुस्त कॅमेरे काढून घेण्याचे आदेश दिलेले असून, लवकरच नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.