आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे आजूबाई जगदंबा उत्सवास गुरूवारपासून सुरूवात झाली आहे. यावेळी प.पू. सोनू महाराज यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आले.यावेळी दीपक महाराज, कालीदास महाराज यांचे नातू प्रफुल्ल भोपे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.येथील उत्सवास ४०० वर्षांची परंपरा आहे. तुकाराम पंतांनी आपल्या कुटुंबाला संतती प्राप्त व्हावी या करीता जगदंबा देवीची आराधना केली. तेंव्हा देवीने त्यांना दर्शन देऊन तुकराम पंताच्या घरी अवतार घेण्याचा साक्षात्कार केला असल्याची अख्यायिका आहे. पंताची पत्नी चंद्रकला बाई यांच्या पोटी जन्म घेतला. मुलीचे नाव आजूबाई असे ठेवण्यात आले. शुक्रवारी ३१ मार्च रोजी आजूबाईचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल, असे संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कालीदास महाराज, सरपंच एकनाथ चौधरी, उपसरपंच अमरजीत देशमुख, नवनाथ दौड, प.स. सदस्य, सुनील सोनवणे, बबनराव देशमुख, मदन कुळवाळ, भगवान खाकरे, कैलास भडक, गणेश महराज, राजू ठाकरे, प्रकाश खराटे, राज संभेराव, कैलास खंडेलवाल, चंदन राऊत, फकीरा पवार, दीपक सोनवणे, अभिजीत देशमुख, मुख्याध्यापक कैलास फाळके, कैलास अन्वेकर, रामदास सिरसाट आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
आजूबाई उत्सवास आन्वा येथे प्रारंभ
By admin | Published: March 31, 2017 12:14 AM