लोकमत नयूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील राजाबाजार व गवळीपुरा परिसरात मागील १०३ वर्षांपासून सुरू असलेला सगर उत्सव शनिवारी उत्साहात पार पडला. शहराच्या चोहोबाजूने सजवून आणलेले हेले (रेडे) व त्यांच्या विविध कसरती पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती.गवळीपुरा (नवाबपुरा) येथील सगर महोत्सवात पडेगाव, जटवाडा, जोगवाडा, रसूलपुरा, नारेगाव, हर्सूल, चिकलठाणा, सातारा, कांचनवाडी, कर्णपुरा, छावणी, दौलताबाद, राजाबाजार, बायजीपुरा, संजयनगर, कैलासनगर या भागांतून हेलेमालकांनी सजविलेले हेले आणले होते. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सगरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नंदकुमार घोडेले, संतोष जेजूरकर, माजी महापौर अशोक सायन्ना, पृथ्वीराज पवार, सचिन खैरे, सेवकचंद बाखरिया, हंसराज डोंगरे, हरीश पवार आदींची उपस्थिती होती.वाजत गाजत हेल्यांना गवळीपु-यात आणले जात होते. तिथून राजाबाजार, जाधवमंडी, मोंढा मार्गे पुन्हा गवळीपुºयात आणले जात होते. येथे हेल्यांचे औक्षण केले जात होते. सगर यशस्वीतेसाठी समितीचे प्रशांत भगत, बाळनामा गवळी, गणेश थट्टेकर, प्रसन्ना राणा, दीपक थट्टेकर यांच्यासह आदी पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.संस्थान गणपती मंदिर परिसरातही सगरअहिर गवळी समाजाच्या वतीने राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हेलेमालक हेल्यांना सजवून आणत होते. हेल्यांच्या शिंगांना मोरपंखांनी सजविण्यात आले होते.अंगावरील केस अशापद्धतीने कापले होते की, त्यातून नवीन नक्षी तयार झाली होती. हेल्याच्या काळ्याभोर अंगावर नक्षीकाम उठून दिसत होते.कल्पकतेने या हेल्यांना सजवून ढोल-ताशाच्या निनादात राजाबाजारात आणले जात होते. येथील कार्यक्रमात सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या हस्ते सगरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संयोजक शंकरलाल पहाडिये, माजी नगरसेवक किशोर तुळसीबागवाले, नगरसेवक मोहन मेघावाले, श्रावण पहाडिये, राधेश्याम चौधरी, मुकेश देवावाले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राजाबाजार येथे संस्थान गणपतीसमोर हेल्यांना नतमस्तक करण्यात येत होते. तसेच दोन पायावर उभे राहण्याची कसरतही त्यांच्याकडून करवून घेतली जात होती. एका हेल्याच्या सगरसमोर चाळीसगावचा बँड लावण्यात आला होता. सहभागी झालेल्या प्रत्येक हेल्याच्या मालकाचा टॉवेल, टोपी, नारळ देऊन सत्कार केला जात होता. येथील सगर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
शतकाची परंपरा कायम ठेवत सगर उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:05 AM