१४ जूनरोजी विभागीय लोकशाही दिन
औरंगाबाद : विभागीय स्तरावरील लोकशाही दिन १४ जूनरोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. तक्रार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालय आवक शाखा प्रमुख यांच्याकडे अर्ज सादर करता येतील.
विभागीय महिला लोकशाही दिन १४ रोजी
औरंगाबाद : विभागीय महिला लोकशाही दिन १४ जून रोजी होणार आहे. यासाठी पीडित महिलांनी खोकडपुरा येथील महिला व बालविकास विभागीय उपआयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभ्यागतांना आरटीपीसीआर बंधनकारक
औरंगाबाद : शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना अपवादात्मक परिस्थितीत उपस्थित राहावयाचे असल्यास त्यांना कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी मागील ४८ तासातील निगेटिव्ह आलेल्या कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक राहील, असे निर्देश दिलेले आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.