शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

घनसावंगीत ९५ टक्के मतदान

By admin | Published: January 15, 2017 11:18 PM

तीर्थपुरी : घनसावंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली.

तीर्थपुरी : घनसावंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी २ हजार ३८७ म्हणजेच ९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.या बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपा-राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना- काँग्रेस यांच्यात लढत झाली. संचालकांच्या १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिगणात होते. रविवारी सकाळपासूनच मतदान केंद्रावर हक्क बजावण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. तीर्थपुरी केंद्रात सोसायटी मतदार संघातून १७७ पैकी १७३, ग्रा.पं. मध्ये १४३ पैकी १३९, व्यापारी गटातून १८७ पैकी १७६, अंतरवाली टेंभीमध्ये सोसायटी गटातून १०९ पैकी १०७, ग्रा.पं. मध्ये ९४ पैकी ९१, घनसावंगी येथे सोसायटी गटातून २४४ पैकी २३०, ग्रा.पं. मधून १५९ पैकी १४८ मतदान झाले. हमाल मापाडी गटातून १८९ पैकी १७२, राणी उंचेगाव येथे सोसायटी मतदार संघातून २०१ पैकी १८९, ग्रा.पं.मधून १४० पैकी १३३, रांजणी येथे सोसायटी गटातून १६२ पैकी १५७, ग्रामपंचायतमधून १२९ पैकी १२६, कुंभार पिंपळगाव येथे सोसायटी गटातून १५१ पैकी १४६, ग्रा.पं. गटातून १५४ पैकी १४६, व्यापारी गटात १७७ पैकी १६८ तर हमाल मापाडी गटात ९२ पैकी ८६ मतदारांनी मतदान केले.या सोसायटीसाठी २५०८ मतदार होते. त्यातील २३८७ मतदारांनी मतदान केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, तालुक्याच्या या बाजार समितीवर कोण वर्चस्व राखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)