शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र पश्चिम महाराष्टÑात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:47 AM

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.

ठळक मुद्दे दोन विमाने खरेदीचा प्रस्ताव : मराठवाड्याला पुन्हा वाटाण्याच्या अक्षता

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी केंद्र सुरु होणार आहे. येत्या १ जूनपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. १०० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात येत असून, त्यातून दोन विमानांची खरेदीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे.सोलापूर, सांगली जिल्ह्यातील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्याबाबत तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होेते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता.पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. १ जूनपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचालींच्या बातम्या येत आहेत, परंतु त्या काळात महाराष्ट्रात ढगांची गर्दी कमी असते. जर ढगांची गर्दी नसेल तर काय करणार, असा प्रश्न आहे. दोन विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे.कायमस्वरूपी केंद्राची शक्यता मावळलीमराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग २०१५ मध्ये पहिल्यांदा झाला. सतत पाच वर्षांपासून या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. कोट्यवधी रुपयांचे दुष्काळी पॅकेज देऊनही प्रश्न पूर्णंत: मिटलेला नाही, त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकाने २०१५ मध्ये घेतला.प्रयोग यशस्वी झाला तर शासन कृत्रिम पावसासाठी लागणारी महागडी यंत्रणा खरेदी करून औरंगाबाद येथे कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय होणार होता; परंतु गेल्या वर्षी आयुक्तालयावरील सी-डॉप्लर रडार काढून ते हलविण्यात आले. त्यामुळे येथील केंद्र होण्याची शक्यता मावळली होती. ते केंद्र आता सोलापूरमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.का हवे होते औरंगाबादला केंद्रऔरंगाबाद हे सेंटर कशासाठी निवडले आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन संचालक सुहास दिवसे आणि शास्त्रज्ञ आर.व्ही. शर्मा यांनी सांगितले होते की, ३०० ते ४५० कि़ मी. परिसरात येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडा