औरंगाबाद : राज्यातील चार कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात व्यावसायीक कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेसाठी ऑनलाईन अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. तिन फेऱ्या आणि स्पाॅट ॲडमिशन प्रक्रीया १४ नोव्हेंबर पर्यत चालणार आहे. तर ४ नोव्हेंबर पासुन कृषी पदवी अभ्यासक्रम शिकवणीला सुरूवात होईल.
तात्पुरती गुणवत्ता यादी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जाहीर होईल. त्यावर आनलाईन आक्षेपासाठी ३ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून पहिल्या फेरीसाठी जागावाटप ११ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. त्यासाठी रिपोर्टींगचा कालावधी १२ ते १४ ऑक्टोबर देण्यात आला आहेत. दुसऱ्या फेरीचे जागा वाटप १९ ऑक्टोबर रोजी तर रिपोर्टींग१९ ते २१ ऑक्टोबर, तिसऱ्या फेरीचे जागा वाटप २८ऑक्टोबर तर रिपोर्टींग कालावधी २९ ते ३१ ऑक्टोबर देण्यात आला आहे. ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीत जागा निश्चिती झालेल्या उमेदवारांनी संबंधीत महाविद्यालयात २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान उपस्थित राहून कागदपत्रे, आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीतील गुणवत्तेनुसार ४ ते ९ नोव्हेंबर प्रवेश फेरी होईल. प्रवेश फेरीची प्रक्रीया महाविद्यालय स्तरावर रविवारी तसेच शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू राहील असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हटले आहे.
अनुदानीत ३३८० तर विना अनुदानीत १३,२४० जागाराज्यात नऊ अभ्यासक्रमाच्या ३३८० अनुदानीत जागा आहेत. तर विना अनुदानीत सहा अभ्यासक्रमाच्या १३ हजार २४० जागा आहेत. चार कृषी विद्यापीठाअंतर्गत हे महाविद्यालये कार्यरत आहेत. सर्वाधिक ७४ महाविद्यालयात बीएसस्सी ऑनर्स कृषी या अभ्यासक्रमाच्या ७,८९० जागा ७४ महाविद्यालयात आहेत. तर बी टेक जैव तंत्रज्ञान १६ काॅलेजमध्ये १२५० जागा, बी टेक अन्न शास्त्र २४ काॅलमध्ये १४८० जागा असून १० काॅलेजमध्ये बीएसस्सी उद्यानविद्याच्या ८४० जागा, बीएसस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या १२ महाविद्यालयात ९०० जागा आहेत. तर बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या १५ महाविद्यालयात ८८० जागा आहेत.
अभ्यासक्रम निहाय अनुदानीत जागा अभ्यासक्रम - महाविद्यालय -जागा बीएस्सी (ऑनर्स कृषी) -२२ -२२४८बीएस्सी (ऑनर्स उद्यानविद्या) -६ -३३२बीएस्सी (ऑनर्स वनशास्त्र) -२ -८२बीएस्सी (ऑनर्स समुदाय विज्ञान) -१- ६०बीएसस्सी (ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन)- १ -६०बीएफसी (फिशरी सायन्स) -१ -४०बी. टेक (अन्न शास्त्र) -३ -१६०बी. टेक (कृषी अभियांत्रिकी) -५ -३०४बी. टेक (जैव तंत्रज्ञान) -२ -१००