मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाहणी : दोनच पथके मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणारऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौºयावर येत असून, तीनऐवजी आता दोनच पथके दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. पहिले पथक गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी आणि सुलतानपूर येथे पथक भेट देईल, तसेच शेतकरी व नागरिकांशी पथकातील अधिकारी संवाद साधून जळगावकडे रवाना होतील, तर दुसरे पथक जालना, बुलडाणा आणि बीड, परभणीचा दौरा करील.इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाºया पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा या पथकाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या उपस्थितीत पथक क्र.१ विभागीय आयुक्तालयातून सकाळी १०.३० वा. गंगापूर तालुक्याकडे प्रस्थान करील. त्यांच्यासमवेत कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए.के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी असतील. दुपारी साडेबारानंतर जळगाव जिल्ह्याच्या दिशेने पथक प्रस्थान करील. तत्पूर्वी विभागीय आयुक्तांच्या दालनात सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत दोन्ही पथकांतील अधिकाºयांसोबत आढावा बैठक होईल.दुसरे पथक सकाळी १०.३० वा. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याकडे प्रस्थान करील. जवसगाव, बेतलम येथे स्थळपाहणी करून पथक २ वा. बुलडाण्याच्या दिशेने जाईल. ६ रोजी दुसरे पथक परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गणेशपूर येथे पाहणी करील. त्यानंतर पेडगाव, रूडी येथे पाहणी करून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रेवली येथे स्थळपाहणी करून शेतकºयांशी संवाद साधेल. तेथून माजलगाव, खडकी, वडवणी भागात पथक जाईल. त्यानंतर जरूड, कांबी येथे पाहणी करील. त्यानंतर पथक ६ रोजी रात्री औरंगाबादला मुक्कामी येईल. दोन्ही पथके ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल देतील. त्या अहवालानंतर केंद्र आणि राज्य शासन शेतकºयांसाठी मदतीबाबत निर्णय घेईल.पश्चिम महाराष्ट्राचा दौरा वगळलाऔरंगाबाद, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बुलडाणा जिल्ह्यांसाठी पहिला दौरा होता. त्यासाठी तीन पथके होती; परंतु मंगळवारी दिवसभर केंद्र, राज्य आणि विभाग पातळीवर नियोजनावर मोठा खल झाला. शेवटी दोनच पथके औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यात जाणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
केंद्रीय पथक गंगापूरमध्ये पाहणार जिल्ह्याचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:46 PM
मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौºयावर येत असून, तीनऐवजी आता दोनच पथके दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. पहिले पथक गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी आणि सुलतानपूर येथे पथक भेट देईल, तसेच शेतकरी व नागरिकांशी पथकातील अधिकारी संवाद साधून जळगावकडे रवाना होतील, तर दुसरे पथक जालना, बुलडाणा आणि बीड, परभणीचा दौरा करील.
ठळक मुद्देकेंद्रीय पथक गंगापूरमध्ये पाहणार जिल्ह्याचा दुष्काळ