शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मराठवाड्यात दुष्काळ पाहणीस केंद्रीय पथक येणार, काय मिळणार लाभ?

By विकास राऊत | Published: December 09, 2023 4:34 PM

चारच जिल्ह्यांत जाणार : खरीप २०२३ मधील नुकसानाचा घेणार आढावा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सरलेल्या पावसाळ्यात १५ टक्के पावसाची तूट राहिली. आठपैकी सहा जिल्ह्यांत कमी पाऊस झाला. ऑगस्ट महिना पावसाअभावी कोरडा गेला. परिणामी खरीप पिकांची उत्पादकता सुमारे ५५ ते ६० टक्क्यांनी घटली. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाचे १२ सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी १३ व १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या पाहणीसाठी येत आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील काही तालुके व गावांना हे पथक भेट देणार आहे. १५ डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल. त्यानंतर केंद्र शासनाकडून एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे दुष्काळग्रस्त भागांसाठी मदत जाहीर होईल. दुष्काळी परिस्थितीवर राज्य शासनाने सुमारे २२१४ कोटींच्या आसपास तरतूद करण्याचे नियोजन केले आहे.

केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात चार चमू तयार केले आहेत. यामध्ये एमआयडीएचे सचिव मनोज के., सहसंचालक जगदीश साहू, नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना, कापूस विकास विभागाचे संचालक डाॅ. ए. एच. वाघमारे, एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया यांचा पथकात समावेश आहे. १३ डिसेंबर रोजी एक पथक छत्रपती संभाजीनगर, जालना; तर दुसरे पथक बीड व धाराशिव जिल्ह्यांत जाईल. १४ रोजी पुणे व सोलापूर, नाशिक व जळगावमध्ये दोन पथके जातील.

राज्य शासनाने घेतलेले निर्णयमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २६१ मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य शासनाने ४० तालुक्यांव्यतिरिक्त १,०२१ मंडळांत नव्याने दुष्काळ यादीत समावेश केला. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यात धाराशिवमधील ३०, छत्रपती संभाजीनगरमधील ४६, नांदेड २१, परभणी ३८, बीड ५२, लातूर ४५, हिंगोली १६, तर जालन्यातील १६ मंडळांचा समावेश आहे. मराठवाड्यासह राज्यातील इतर प्रशासकीय विभागांतील ७६० मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने १० नोव्हेंबर रोजी जाहीर केला.

काय मिळणार लाभ?जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शैक्षणिक शुल्क माफ, रोहयोंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांची वीज खंडित न करणे हे लाभ दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील मंडळांतर्गत मिळतील.

 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद