वाळूज महानगर : औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी शुक्रवारी पथकासह वाळूज एमआयडीसीत भेट देवून विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कचरा प्रकल्प, रस्ते व अतिक्रमणाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
एमआयडीसी निवासी क्षेत्रात दोन दशकानंतर २७ कोटी रुपये खर्चातून मुख्य व अंतर्गत रस्ते गुळगुळीत केले जात आहेत. शिवाय उद्योगनगरीसह निवासी क्षेत्रातील कचरा समस्या कायमची सोडविण्यासाठी बीओटी तत्वावर कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच बजाजनगरातील अतिक्रमणाचा विषयही सध्या जोरात गाजतोय.
त्यामुळे सीईओ पी. अनबलगन यांनी शुक्रवारी पथकासह वाळूज एमआयडीसीला भेट दिली. यावेळी सुरु असलेल्या कचरा प्रकल्प, रस्ते कामाची पाहणी करुन विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता सुभाष तुपे, अधीक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, स. अभियंता बी.एस. दिपके आदी उपस्थित होते.