छत्रपती संभजीनगर : 'आम्ही पाेलिस आहोत, अंगावरील दागिने पर्स मध्ये ठेवा', असे सांगत सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशाच्या पत्नीचे तब्बल ११ ताेळे सोने लुटून नेले. दर्गा रस्त्यावर शनिवारी सकाळी नऊ वाजता ही धक्कादायक घटना घडली, हे विशेष. गेल्या पाच दिवसांमधली ही महिलांच्या लुटमारीची तिसरी घटना आहे. पोलिसांसमोर आता सोनसाखळी चोरांना पकडण्याचे नव्याने आव्हान उभे राहिले आहे.
सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश दत्तात्रय राजे व त्यांची पत्नी सुनिता (६०) हे उल्कानगरीत राहतात. शनिवारी सुनिता दूध डेअरीवर जाण्यासाठी पावणेनऊ वाजता घराबाहेर पडल्या. रोपळेकर रुग्णालयामार्गे त्या डेअरीवर पोहोचल्या. त्याच वेळी त्यांच्याजवळ दोन दुचाकीस्वार गेले. 'आजी, आम्ही पोलिस आहोत, वरिष्ठांच्या सूचना आहेत, अंगावर एवढे दागिने घालू नका, सर्व दागिने पर्समध्ये ठेवा', असे सांगितले. सुनिता यांनी विश्वास ठेवत अंगावरील ११ तोळे दागिने पर्समध्ये ठेवले. ते ठेवताच क्षणार्धात चोरांनी ती पर्स जोरात ओढून सुसाट पसार झाले. त्यानंतर खऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पाच दिवस, तीन घटनादुचाकी चोरी, मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटना सुरू असताना आता सोनसाखळी चोरही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झाले असून पुन्हा महिलांना लक्ष्य केले आहे.
-पहिली घटना२० ऑगस्ट रोजी बजाजनगरमध्ये जयश्री जावळे या मुलासह स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी गेल्या असताना त्यांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र चोरांनी लंपास केले.
-दुसरी घटनादीपनगरच्या स्नेहलता सराफ (६५, रा. दीपनगर) या २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता परिसरातील गणपती मंदिरात जात होत्या. तेव्हा दुचाकीस्वार चोरांनी समोरून येत त्यांचे १२ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.