औरंगाबाद : एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीला खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने जलील यांनी धर्माच्या नावावर मते मागितल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांने जलील यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत एमआयएम- वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी कमी मताधिक्याने बाजी मारली. यावेळी पराभूत झालेले बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी या विजयाच्या विरोधात आज औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेत जलील यांच्यासाठी धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पुराव्यासाठी एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दिन ओवेसी यांच्या भाषणाची सीडी याचिकाकर्त्याने खंडपीठात दाखल केली आहे. याद्वारे याचिकाकर्त्यांने जलील यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती खंडपीठाकडे केली आहे.
खासदार जलील यांच्या विजयाने एमआयएम पक्षाला ओवेसीनंतर हैद्राबाद बाहेर दुसरा खासदार मिळाला होता. यामुळे या याचिकेच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पहा लोकसभा निवडणुकीत विजयानंतर काय होती इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया