लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सनातनचे कार्यकर्ते शोधण्याचे तपासयंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकामागून एक घटना समोर येत असल्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, याबाबत एटीएस, सीबीआयला अजून धागेदोरे सापडलेले नाहीत. शहर व जिल्ह्यात एवढे घडत असताना येथील पोलीस यंत्रणेची सतर्कता शून्य असल्याचेदेखील यानिमित्ताने पुढे आले आहे.जानेवारीपासून आजवर औरंगाबाद विविध सामाजिक घटनांमध्ये होरपळले आहे. त्यात पोलिसांनी काय कामगिरी केली, हे औरंगाबादकरांना ज्ञात आहे. शहर व परिसरातील दहशतवादी कारवायांचे नेटवर्क शोधण्याचे आव्हान एटीएस, सीबीआयच्या आधी पोलिसांसमोर आहे.मागील काही दिवसांपासून विविध घटनांमध्ये सनातनच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेल्या धरपकडीमुळे जिल्ह्यात सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. औरंगाबादचे कनेक्शन पुणे, कोल्हापूर, जालना, अशा त्रिकोणात असल्याचे समोर आले असून, सीबीआय आणि एटीएसकडे आणखी काही धागेदारे असण्याची शक्यता आहे.१९९९ साली सनातन संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेचे ध्येय हिंदुत्ववादी असून, शहरातील बहुतांश भागामध्ये या संस्थेचे कार्यकर्ते आहेत. यातील कोण कोणत्या कारवायांमध्ये सहभागी आहे, याचे नेटवर्क शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे.२००० सालापासून २०१८ पर्यंतचा आढावा घेतला, तर शहरातील हिंदू-मुस्लिम दहशतवादी कारवायांची माहिती पुढे येते. त्यात सनातनच्या छुप्या कारवायांची भर पडली असून, नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येशी औरंगाबादचे कनेक्शन तपासात आढळून आल्याने आणखी कुठे-कुठे सनातनी नेटवर्क दडले आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणा कसे पेलणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
‘सनातनी’ जाळे शोधण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:29 AM
सनातनचे कार्यकर्ते शोधण्याचे तपासयंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकामागून एक घटना समोर येत असल्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, याबाबत एटीएस, सीबीआयला अजून धागेदोरे सापडलेले नाहीत. शहर व जिल्ह्यात एवढे घडत असताना येथील पोलीस यंत्रणेची सतर्कता शून्य असल्याचेदेखील यानिमित्ताने पुढे आले आहे.
ठळक मुद्देपोलिसांची शून्य सतर्कता : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत सनातनी कार्यकर्त्यांचे नेटवर्क