अशोक काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेकनूर: गेवराई शहरातील घाडगे दाम्पत्याची हत्या करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलेल्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच बीड तालुक्यातील नेकनुर येथे बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला. पोलीस ठाण्यासमोरच तब्बल पाच दुकाने एकाच रात्री फोडल्याने खळबळ उडाली आहे. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोºयांचे प्रमाण वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.मागील काही दिवसांपासून चोरी, दरोडा, घरफोडी या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच गेवराई शहरातील आदिनाथ घाडगे व अलका घाडगे यांच्या हत्येने तर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा तपास सुरू असतानाच बुधवारी रात्री व गुरूवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी नेकनूरमध्ये एकाच रात्री पाच दुकाने फोडून धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे हा सर्व ‘खेळ’ पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर झाल्याने दहशत निर्माण झाली आहे.पोलीस ठाण्यासमोरीलच प्रदीप श्रीमाळ यांचे प्रदीप किराणा दुकान, फुलचंद नागरगोजे यांचे नागरगोजे ज्वेलर्स, एम.एस.रोटे यांचे रोटे ज्वेलर्स, अमजद शेख यांचे हयात व प्रवीण काळे यांचे बंकटस्वामी मेडिकलमध्ये चोरी झाली. किराणा दुकानातील तीन ते चार किलो काजू, तीन किलो बादाम, गल्ल्यातील चिल्लर रोख रक्कम, बंकटस्वामी व हयात मेडिकलही सुमारे आठ हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर चोरांनी आपला मोर्चा नागरर्गोजे व रोठे ज्वेलर्सकडे वळविला. दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु चॅनल गेट मुळे चोरांचा प्रयत्न अयशस्वी झाला. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
चोरट्यांचे पोलिसांना ‘आव्हान’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:25 AM