औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वेमार्गाचा विस्तार, मुबलक पाणी यांशिवाय समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत मराठवाड्याच्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळणार नाही, असे ‘सीआयआय’चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
ते म्हणाले, जोपर्यंत समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत उद्योजकांना मुंबई पोर्टपर्यंत थेट मालवाहतुकीची सुविधा मिळणार नाही. मनमाड ते परभणीपर्यंत रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, औरंगाबाद-नगर नवीन रेल्वेमार्ग लवकर होण्याची गरज आहे.
उद्योगांना चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शनी पाहिजे. या संदर्भात घोषणा झाली ते अ
‘डीएमआयसी’त मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जावेत. अनेक राज्यांमध्ये उद्योग नेण्यासाठी स्पर्धा लागलेल्या आहेत. त्या स्पर्धेत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे प्रयत्न व्हावेत. जेव्हा ‘डीएमआयसी’ आली त्याच वेळी २०१२-१३ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शन सेंटरची (कन्व्हेन्शन सेंटर) घोषणा झाली होती; परंतु अद्याप ती पूर्ण झाली नाही. हे सेंटर अस्तित्वात आल्यास दर तीन महिन्यांनी किमान ५० हजार उद्योजक येथे भेटी देतील. यातून उद्योगांना चालना मिळेल. औद्योगिक प्रदर्शनातून देश-विदेशांतील विविध कारखानदारांना गुंतवणूक करण्यासाठी चालना दिली जावी, याकडेदेखील लक्ष वेधून मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
बहुमजली पार्किंगची योजना
येथे पार्किंगचा मोठा प्रश्न असून त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. वाहन पार्किंगचा अडथळा सातत्याने भेडसावत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे बहुमजली पार्किंग. ही योजना अस्तित्वात आल्यास वाहतूक सुरळीत होईल.
विमानतळाचा विस्तार हवा
आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास विदेशातील गुंतवणूकदार थेट औरंगाबादेत येऊ शकतात. त्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. मराठवाड्याबाबत मार्केटिंग करण्यासाठी आपण कमी पडतो.