शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आव्हान; पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:06 PM

नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दुपारी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढलेली गुन्हेगारी, ठिकठिकाणी भूमाफियांची गुंडगिरी, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे थांबवण्याचे आव्हान नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर असेल. गेल्या वर्षभरात शहरात कथित गावगुंडांनी तोंड वर काढल्याने त्यांच्यावरही आयुक्त पवार कसे वचक निर्माण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. पवार यांनी दुपारी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बराच वेळ अन्य अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.

तत्कालीन आयुक्त मनोज लोहिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाने नक्षली विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपवला होता. पाटील यांनी झपाट्याने काम सुरू केल्याने त्यांच्याच पूर्णवेळ नियुक्तीची चर्चा होती. मात्र, शासनाने पुण्याचे सहआयुक्त प्रवीण पवार यांची पूर्णवेळ आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. बुधवारी पवार यांना पुणे पेालिसांनी निरोप दिला. त्यानंतर गुरुवारी सकाळी पवार शहरात दाखल झाले. दुपारी १.३० वाजता मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.

गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आवाहनगेल्या पाच महिन्यांमध्ये लुटमार, चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी विक्रम रचला आहे. १३७ घरफोड्या, ४८७ वाहन चोऱ्या, तर ८१ नागरिकांना लुटले गेले. यातील बोटांवर मोजण्याइतक्याच घटनांमध्ये पोलिस गुन्हेगारांचा शोध लावू शकले. पोलिस ठाण्यांमधील डीबी पथके ‘अर्थपूर्ण’ कामातच गुंतली असल्याने गुन्हेगारांवरचा वचकदेखील संपला आहे. त्यामुळे सुस्तावलेल्या डीबी पथकांना सरळ करून गुन्हेगारी आटोक्यात आणून धार्मिक तणाव हाताळण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त पवार यांच्यासमोर आहे.

कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य द्यापवार यांनी सायंकाळी शहराचे पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सर्व ठाणे प्रभारींची बैठक घेतली. यात त्यांनी शहरातील पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. शिवाय, त्यांना अपेक्षित कामाच्या शैलीविषयीदेखील स्पष्ट सूचना केल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची सर्वाधिक कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य राहायला हवे, अशी सक्त सूचनाच त्यांनी केली. ठाण्यांमधील सर्व संसाधने व्यवस्थित ठेवा, पोलिसांचे दैनंदिन काम जसे की रेकॉर्ड सांभाळणे, गुन्हेगारांवर पाळत ठेवणे, प्रतिबंधात्मक कारवाया हे वेळेवर पार पडले पाहिजे. पोलिस कुठेही कमी पडता कामा नये, अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस