औरंगाबाद : डावखुरा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळेच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर ग्रामीण पोलीसने आज एमजीएम मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात शहर पोलीसचा २७ धावांनी पराभव करीत शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियनचा बहुमान मिळवला.ग्रामीण पोलीसने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत ३ बाद १७६ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून प्रदीप जगदाळेने २ षटकार व ६ खणखणीत चौकारांसह ७0 धावांची वादळी खेळी केली. विकास नगरकरने ३२, अजय काळेने ३३ व निरंजन चव्हाण आणि सतीश भुजंगे यांनी प्रत्येकी १७ धावा केल्या. शहर पोलीस अ कडून गिरिजानंद भक्त, राहुल जोनवाल व सुदर्शन एखंडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीसचा संघ ७ बाद १४९ पर्यंत मजल मारूशकला. त्यांच्याकडून शेख असीफने २७, सुदर्शन एखंडेने २६, मोहंमद इम्रानने २५ व शेख मुकीमने २४ धावा केल्या. ग्रामीण पोलीसकडून विकास नगरकर, प्रदीप जगदाळे यांनी प्रत्येकी २ तर श्रीकांत तळेगावे, निरंजन चव्हाण, सतीश श्रीवास यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. बक्षीस वितरण जीएसटीचे सहआयुक्त अशोक कुमार, एमजीएमचे डीन डॉ. प्रवीण सूर्यवंशी, संजय चिंचोलीकर, गिरीश गाडेकर, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, भगतसिंह क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उद्धव भवलकर, सचिव दामोदर मानकापे, सुधीर ओंकार, गंगाधर शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले.स्पर्धेचे मानकरीफलंदाज : शेख मुकीमगोलंदाज : संदीप जाधवमालिकावीर : प्रीतेश चार्ल्ससामनावीर : प्रदीप जगदाळेग्रामीण पोलिसच्या कर्णधाराची खिलाडूवृत्तीया स्पर्धेत १४ बळी घेणाऱ्या ग्रामीण पोलिस संघाचा कर्णधार संदीप जाधव याला सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार जाहीर झाला; परंतु संदीप जाधव याने आपला पुरस्कार श्रीकांत तळेगावे याला देत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. श्रीकांत हा नोकरी करुन स्पर्धेसाठी पैठणहून येत होता. त्याने १३ बळी घेतले असले तरी आघाडी फळीतील फलंदाजांना बाद केले म्हणून आपण हा पुरस्कार त्याला देत असल्याचे संदीपने जाहीर केले.
ग्रामीण पोलीसचा संघ बनला चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 1:06 AM