शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल; संदीप देशपांडेंचा जोरदार प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 1:59 PM

उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने विरोधकांना फटकारले आहे यातून विरोधकांनी बोध घ्यावा.

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आम्ही मनसेच्या सभेकडे आम्ही लक्ष देत नाहीत, अशी टीका शुक्रवारी केली होती. यावर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, खैर म्हणजे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल आहेत असे जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी विरोध करत रहावा आम्ही आमच्या मार्गाने पुढे जात राहू, असा निश्चय देशपांडे यांनी व्यक्त केला. ते राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये आले आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्याहून संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन औरंगाबादकडे निघाले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ते शहरात दाखल होतील. दरम्यान, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या १ मे रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी मनसेचे अनेक नेते शहरात दाखल झाले आहेत. सभेला होणारा विरोध, विरोधी पक्षांची टीका याचा मनसेचे संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, लोकशाही मार्गाने विरोध करावा, पण उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने विरोधकांना फटकारले आहे यातून विरोधकांनी बोध घ्यावा. आम्ही आमच्या मार्गाने पुढे जात राहू. राज ठाकरे यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांना धक्का बसला आहे, असेही देशपांडे म्हणाले. 

यासोबतच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना देशपांडे यांनी ते शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल असल्याचे म्हणत शिवसेनेवर प्रतिहल्ला केला. शिवसेनेचे स्वतःचे पहावे, रोज का बोलताय जनता आमच्या बाबतीत निर्णय घेईल ,शिवसेना का मधे पडत आहे, असा सवाल देशपांडे यांनी केला. राज ठाकरे यांच्या सभेला मिळणाऱ्या सभेला जो प्रतिसाद मिळत आहे यावरून मनसेचे भवितव्य उज्वल आहे. भाजपसोबत युतीचा त्यांच्याकडून किंवा आमच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरे