बीड : जिल्हा परिषदेत शुक्रवार (दि़ १७) पासून बदल्यांची प्रक्रिया पार पडत आहे़ बदल्यांत अनियमितता होऊ नये यासाठी ्रप्रथमच चित्रीकरण होणार आहे़ १७ ते २५ मे या कालावधीत बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पडणार आह़े़ यावेळी जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, सीईओ राजीव जवळेकर व विभाग प्रमुखांची उपस्थिती राहील. प्रशासकीय बदल्या १० टक्के तर विनंती बदल्या ५ टक्क्यापर्यंत करता येतील़ त्यासाठी ५ वर्षे सलग सेवा ही अट आहे़ शुक्रवारी पहिल्याच दिवशी कृषी, पशूसंवर्धन, बांधकाम, लघुपाटबंधारे, वित्त, ग्रामीण पाणीपुरवठा व बाल कल्याण विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या होतील़ १८ रोजी पंचायत व आरोग्य विभाग तर १९ रोजी सामान्य प्रशासन विभागातील कर्मचार्यांची बदली प्रक्रिया होईल़ २० रोजी प्राथमिक शिक्षण तर २१ रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागातील बदल्या होतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती यांनी सांगितले़ बदल्यांची प्रक्रिया चित्रीकरणात तसेच आॅनलाईन पार पडणार आहे़ त्यामुळे बदल्यांत पारदर्शकता राहील असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला़ बदलीपात्र कर्मचार्यांची माहिती आली असून शासन निर्णयानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी) यांच्या फक्त विनंती बदल्या शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी यांच्या जिल्हा स्तरावरील प्रशासकीय बदल्या होणार नाहीत तर फक्त ५ टक्के विनंती बदल्या होणार आहेत़ बदलीपात्र शिक्षकांचे ‘रेकॉर्ड’ मागविले आहे़ सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या होतील़ आक्षेप मागवून अंतिम यादी प्रसिद्ध करु, असे शिक्षणाधिकारी (प्रा़) भास्कर देवगुडे यांनी सांगितले़
शनिवारपासून जि.प.मध्ये चित्रीकरणात बदल्या
By admin | Published: May 15, 2014 11:13 PM