लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वाहनांचे चेसिस क्रमांक आणि रंग बदलून बनावट कागदपत्रांच्या आधारे हायवा ट्रक आणि अन्य वाहने विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या एमआयएमचा नगरसेवक शेख जफर आणि त्याच्या टोळीला आरटीओ कार्यालयातील कोणाकोणाचे अभय होते, याबाबतचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला.औरंगाबाद शहर गुन्हे शाखेने बनावट चेसिस आणि इंजिन नंबरच्या गाड्यांची विक्री करणाºया टोळीचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि त्यांच्या पथकाने आतापर्यंत अशाप्रकारे औरंगाबाद आणि बीड आरटीओ कार्यालयात नोंदणी झालेले १७ ट्रक आणि १ कार जप्त केली. एका प्रकरणात नगरसेवक शेख जफर, त्याचा भाऊ शेख बाबर आणि शेख जावेद शेख अब्दुल्ला (सर्व रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद आहे, तर सिडको ठाण्यातील गुन्ह्यात शेख बाबरसह ३ जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. भाडेतत्त्वावर घेतलेले अथवा चोरीच्या हायवा ट्रकला चिकलठाणा येथील आरोपीच्या ट्रक बॉडी बिल्डर येथे नेऊन आरोपी ट्रकचा ओरिजनल चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि नंबर खोडून त्याठिकाणी बनावट चेसिस आणि इंजिन क्रमांक आणि नंबर टाकीत. एवढेच नव्हे तर त्या ट्रकचा रंगही ते बदलून टाकत. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी रंग आणि चेसिस क्रमांक बदललेले ट्रक विक्री करीत. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी एमआयएमचा नगरसेवक जफर बिल्डरसह त्याच्या साथीदारांना अटक केली, तर औरंगाबाद गुन्हे शाखेने जफर बिल्डरचा भाऊ आणि अन्य लोकांना अटक केली. गुन्हे शाखेने या टोळींनी विक्री केलेले १७ ट्रक आणि १ कार जप्त केली आहे. यातील आठ ते दहा वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात तर उर्वरित वाहनांची नोंदणी अन्य जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे.
चेसिस नंबर बदलून वाहनविक्रीचा गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:59 AM