बीड : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार प्रभारींवर सुरु आहे़ त्यामुळे पशुधनाच्या उपचारासह प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत़ जिल्हा परिषदेत श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ५७ असून श्रेणी दोनचे ८३ दवाखाने आहेत़ श्रेणी एक मधील पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील २१ पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ तसेच पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या ७ पैकी दोन जागा भरलेल्या नाहीत़ जिल्हा दुष्काळी स्थितीला तोड देत आहे़ चाऱ्या, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ गुरांना सतत या ना त्या लसी टोचून त्यांना सुदृढ ठेवण्याची गरज आहे़ मात्र, नेमक्या याचवेळी पशुसंवर्धन विभागाचा कारभार प्रभारींवर सुरु आहे़ महत्त्वाचे म्हणजे दुष्काळामुळे दुग्धउत्पादनावरही परणिाम झाला आहे़ विभागाच्यरा संबंधित विविध योजना राबविणे देखील अडचणीचे ठरत आहे़ परळी, धारुर, वडवणी व शिरुर या पंचायत समित्यांमध्ये पशुधन विस्तार अधिकारी पदाच्या जागा रिक्त आहेत़ सुधारित आकृतीबंधानुसार माजलगाव, केज येथे प्रत्येकी दोन व अांबाजोगाईत ३ असे एकूण ७ पशुधन पर्यवेक्षक पदे मंजूर आहेत़ मात्र, ही पदेही भरली जात नाहीत़ (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुुंडे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली़ भरती प्रक्रिया शासनस्तरावरुन होते़ त्यामुळे हा प्रश्न निकाली काढावा असे दौंड म्हणाल्या़ जिल्ह्यात दुष्काळ असल्याने या प्रश्नाकडे गांभिर्याने पहावे़ पाठपुरावा सुरु असून लवकरच नवीन अधिकारी येतील, असे उपाध्यक्षा दौंड यांनी ‘लोकमत’ला सांगितले़
पशुसंवर्धन विभागाचा कारभार प्रभारींवर
By admin | Published: November 25, 2014 12:22 AM