वरखेड गावातील सबस्टेशन येथे लाईटचे काम करण्यासाठी तंत्रज्ञ किरण मोरे यांनी परवानगी घेऊन वरखेड भागातील लाईट बंद केली होती. या कारणावरून वरखेड गावातील शेतकरी कल्याण जानराव व अशोक वाघ यांनी वरखेड सब स्टेशन येथे येऊन लाइट बंद का केली, अशी विचारणा येथील लाईन ऑपरेटरला केली. तेव्हा त्यांनी किरण मोरे यांनी काम करण्यासाठी लाईट बंद केली असून थोड्या वेळाने पुर्ववत होईल असे सांगितले. दरम्यान याच वेळी किरण मोरे विद्युत वाहिनीचे काम पूर्ण करून सब स्टेशन येथे आले असता, दोन्ही आरोपीनी फिर्यादिस शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यामुळे किरण मोरे यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि. रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. अमोल ढाकणे हे करीत आहेत.
विद्युत तंत्रज्ञाला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:05 AM