शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिवसेना आमदारास सोशल मीडियातून जाब विचारला; चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 7:15 PM

Shiv Sena MLA Udaysingh Rajpup News : कन्नड-चिकलठाण रस्ता दुरावस्थेमुळे तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देचिकलठाण पंचक्रोशित रस्त्याच्या कामाबाबत प्रचंड संताप आहे.

कन्नड ( औरंगाबाद ) :  कन्नड- चिकलठाण रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओकरून युवकांनी सोशल मिडीयातून येथील शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांना जाब विचारला. मात्र, काही व्हायरल व्हिडिओ हे आमदारांची बदनामी करणारे आहेत, असा आक्षेप घेत शिवसेना विभागप्रमुख युवराज चव्हाण यांनी चार युवकांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Charges filed against four persons who asked Shiv Sena MLA Udaysingh Rajput about the poor condition of the road through social media ) 

कन्नड-चिकलठाण रस्ता दुरावस्थेमुळे तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. दुरुस्तीची सातत्याने मागणी करूनही याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पावसामुळे तर या रस्त्याच्या अवस्था अत्यंत खराब होऊन प्रवास करणे जीवावर बेतणारे ठरत आहे. यामुळे चिकलठाण पंचक्रोशित रस्त्याच्या कामाबाबत प्रचंड संताप आहे. या संतापाचा उद्रेक समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना दिसत आहे. यातूनच काही युवकांनी रस्त्याची दुरवस्था दाखवणारे व्हिडिओ बनवून सोशल मीडियात व्हायरल केले. या व्हिडिओतून आमदार उदयसिंग राजपूत यांची बदनामी करण्यात आली अशी तक्रार शिवसेनेचे विभागप्रमुख युवराज चव्हाण यांनी पोलिसात केली. या रस्त्याचे काम आमदार राजपूत यांच्या सूचनेनुसार मी स्वतः करून घेत आहे. या दरम्यान, युवकांचे आमदार राजपूत यांची बदनामी करणारे सोशल मिडियाचे स्टेट्स दिसले,असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावरून पोलिसांनी आकाश बोरसे, निलेश चव्हाण, प्रशांत चव्हाण व रेवणनाथ पल्हाळ ( सर्व रा चिकलठाण )  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

रस्त्याचे काम तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेतचिकलठाण ते कन्नड या बारा कि.मी. रस्त्याची संपूर्णपणे वाट लागली आहे. यामुळे भोकनगाव, दाभाडी, बहिरगाव, कुंजखेडा, हिवरखेडा, वडाळी, नीमडोंगरी, ठाकूरवाडी, घुसूर तांडा या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. वीस मिनिटांचे हे अंतर कापण्यासाठी खड्डे व उखडलेल्या गिट्टीमुळे वाहनधारकांना तब्बल एक तास लागतो. येथून सतत ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांना पाठीच्या मणक्यांचा व मानेचा त्रास सुरू झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचून सतत अपघात होत असतात. २०१८ मध्ये मंजूर झालेले काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने ठेकेदार,  सा.बां. अधिकारी आणि स्थानिक शिवसेना आमदार  उदयसिंग राजपूत यांच्यावर ग्रामस्थांचा प्रचंड रोष आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी