शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

औरंगाबाद हादरवणाऱ्या कशीश खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल; तांत्रिक माहितीद्वारे पुरावे सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 7:18 PM

औरंगाबादेत गाजलेले खून प्रकरण : भक्कम पुरावे एसआयटीने केले वेळेत सादर, ४५ फोल्डर, ६५७ पानांची चार्जशीट

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रित कौर ऊर्फ कशीशचा (वय १८, रा. उस्मानपुरा) शरणसिंग सेठीने (२०, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) २१ मे रोजी दुपारी रचनाकार काॅलनीत भरदिवसा निर्घृण खून केला होता. या तपासासाठी स्थापन एसआयटीने ४५ फोल्डरचे ६५७ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

माझ्यावर प्रेम का करत नाही, म्हणून शरणसिंगने धारदार शस्त्राने तब्बल १७ वेळा वार करून कशीशची हत्या केली. वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याच्या राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, अजित दगडखैर, अंमलदार सुनील बडगुजर, वीरेश बने यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) २६ मे रोजी स्थापन केले. सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात एसआयटीने निरीक्षक आघाव आणि पातारे यांच्यासह नेतृत्वात वेगाने तपास केला. हवालदार सुनील बडगुजर व पोलीस नाईक वीरेश बने यांनी मदतनीस म्हणून काम केले. त्यानंतर दोषाराेपपत्र मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात वेळेत सादर केले.

काय आहे दोषारोपपत्रात ?-महत्त्वाचे व प्रत्यक्षदर्शी ८१ साक्षीदारांचे जबाब-भाैतिक पुराव्यात घटनास्थळावरील रक्त, मृत तरुणीचे कपडे, आरोपीचे कपडे- डिजिटल व तांत्रिक पुराव्यात सीसीटीव्ही फुटेज सीडीआर, एसडीआर, टाॅवर लोकेशन- न्यायसहाय्यक वैद्यकीय पुरावे पोस्टमार्टेम रिपोर्ट, इन्ज्युरी सर्टिफिकेट- महत्त्वाच्या पंचनाम्यात गु्न्ह्यात वापरलेले हत्यार खंजीर, आरोपीचा मोबाईल, आरोपीचे कपडे जप्त, मेमोरंडम पंचनामा-डिजिटल मॅप-घटनेच्या १२ किलोमीटर परिसरातील एक्सपर्टकडून तयार केलेला डिजिटल नकाशा-आरोपी कशीशचा पाठलाग करतानाचा मार्ग दर्शविणारा नकाशा-घटनास्थळी कशीशला खेचून नेण्याचा मार्ग दर्शविणारा नकाशा-आरोपी खून करून पायी व त्यानंतर रिक्षाने बसून पळून जातानाचा मार्ग दर्शविणारा नकाशा,-आरोपीने गुन्हा करून मुद्देमाल लपवून ठेवलेला मुद्देमाल दर्शविणारा नकाशा-आरोपी, मृत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे घटनास्थळी असल्याबाबतचे सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावा अशा संपूर्ण घटनेचा डिजिटल मॅपचा यात समावेश आहे. भक्कम पुरावे हस्तगत करून मुदतीत हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद