शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

तिसऱ्या श्रावणी शनिवारनिमित्त फळांनी केला भद्रा मारूतीचा आकर्षक शृंगार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 7:08 PM

श्रावणी शनिवारनिमित्त विविध फळांनी भद्रा मारूती मूर्तीचा आकर्षक शृगांर केल्याने ती आकर्षक व सुंदर दिसत होती. 

खुलताबाद (औरंगाबाद) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या  दर्शनासाठी श्रावणाच्या तिस-या शनिवारी भाविकांची मोठी गर्दी केली. श्रावणी शनिवारनिमित्त औरंगाबाद येथील जयसुख पटेल यांनी विविध फळांनी भद्रा मारूती मूर्तीचा आकर्षक शृगांर केल्याने ती आकर्षक व सुंदर दिसत होती. 

श्रावण महिन्याचा तिसरा  शनिवार असल्याने ऱात्रीपासुनच खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही अनेक भाविक पायी निघाले होते. यात औरंगाबाद शहर परिसरातून येणा-या  भाविकांची संख्या मोठी  होती. पायी  येणा- या  भाविकांच्या सोयीसाठी औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी सेवाभावी, सामाजिक  संस्थेतर्फे चहापाणी व फराळांची व्यवस्था करण्यात आली होती. 

भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी रात्रीपासुनच भाविक खुलताबादेत दाखल होत होते.  जय भद्राचा जयघोष करीत  भाविकांंच्या पालखी सवाद्य मिरवणुकीने खुलताबाद शहराच्या चोहोबाजुच्या रस्त्याने येत होत्या. रात्रीपासुनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पवनपुत्र हनुमान कि जय, बजरंग बली कि जय, भद्रा हनुमान कि जय म्हणत भाविक दर्शन घेत होते. सकाऴपासुन तर गर्दीत वाढ झाली दिवसभर हनुमानभक्तांची वर्दऴ सुरूच होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

दिवसभर जिल्ह्यातून,  परजिल्ह्यातून. दर्शनासाठी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. औरंगाबाद येथील जयसुख पटेल हे श्रावण महिन्यात दररोज भद्रा मारूतीचा आकर्षक शृगांर करतात त्यातच श्रावणामधील दर  शनिवारी वेगवेेगळ्या फऴा-फुलांनी ,मोत्यांनी  शृगांर करतात. आज तिस-या  शनिवारी  त्यांनी व निलेश देशमुख,वल्लभ लढ्ढा,श्रीप्रकाश पुरवार,संजय काळे यांनी केळी, केळीचे खांब (केळीच्या घडासहीत) , मोसंबी, डाळींब, सफरचंद,टरबुज,  कच्च्या कैरी, चिकू, लिंबू  , केळीचे फुले या सर्व फळफुलांनी भद्रा मारुती मूर्तीचा आकर्षक शृगांर केला होता. मुर्तीची आगळावेगळा शृगांर केल्यामुळे दिवसभर हा शृगांर करणा-या हनुमानभक्तांचे कौतूक होत होते.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एस.टी.महामंडळाच्यातीने जादा बसेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक हरीश खेडकर  व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. भाविकांचे सुरऴीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, विश्वस्थ लक्ष्मण फुलारे, लक्ष्मण वरपे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे  व  कर्मचारी  पदाधिकारी व स्वंयसेवक परिश्रम घेत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhadramarutiभद्रामारुतीspiritualअध्यात्मिक