औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारानिमित्त शहरात प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारसंघांत पोहोचण्यासाठी बहुतांश नेत्यांनी चार्टर विमानांतून प्रवासाला प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत २२ वर चार्टर विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग आणि टेकऑफ झाले.
शहरात लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या सभांसाठी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आ. राजाभय्या, बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी, पंजाब सरक ारमधील क ाँग्रेसचे मंत्री तथा माजी क्रि के टपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते आले होते.
पक्षांतील वरिष्ठ नेत्यांना पाचारण करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्य दिले जाते. प्रत्येक उमेदवार पक्षासाठी महत्त्वाचा असल्याने नेतेमंडळींनी प्रचारासाठी आयोजित सभांसाठी आवर्जून हजेरी लावण्यावर भर दिला. वेळ वाचविण्यासाठी हवाई साधन अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकाच दिवसांत कमीत कमी वेळ अनेक ठिकाणी हजर राहण्यासाठी चार्टर विमानांचा वापर करण्यावर भर देण्यात आला. औरंगाबादेत आलेले अनेक नेते चार्टर विमानाने शहरात दाखल झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत विमानतळ चार्टर विमानांच्या उड्डाणांनी गजबजून गेले होते.
जालना येथे सभेसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेदेखील विमानाने दाखल झाले होते. मागील दहा दिवसांत २२ पेक्षा अधिक चार्टर विमानांची ये-जा झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.
खर्च वाचविण्यासाठी शक्कलनिवडणुकीत हवाई खर्च दाखविला जात नाही, अशी ओरड होते. त्यामुळे चार्टर विमानांच्या उड्डाणांवर नजर ठेवली जात आहे. क ोणत्या पक्षाचे नेते कुठून आले, कसे आले, यासंबंधीची खातरजमा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. यावर शक्कल एकाच विमानातून दोघांचा प्रवास, उद्योजक मंडळींच्या विमानातून प्रवास करण्यास पसंती दिली गेल्याचे समजते. शहरात एखादा नेता प्रचारासाठी चार्टर विमानाने आला तर त्यासंबंधीचा खर्च नेत्यांकडे की उमेदवारांकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.