शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

अनोळखीसोबत चॅट पडले महागात; तरुण ब्लॅकमेल करत थेट मुलीच्या होस्टेलपर्यंत पोहोचला

By सुमित डोळे | Published: March 13, 2024 11:35 AM

दामिनी पथकाने तरुणाला घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : आई- वडील बीडमध्ये सर्वसामान्य शेतकरी. तिचे वय अवघे तेरा वर्षे. मात्र, हातात स्मार्टफोन आला आणि एका क्लिकवर सर्व जग उपलब्ध झाले. तेव्हा स्नॅपचॅट या चॅटिंग अपवर तिची १३ वर्षांनी मोठ्या तरुणासोबत ओळख झाली. सोळाव्या वर्षी शिक्षणानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर ती त्याला भेटलीदेखील. मात्र, धोका वाटायला लागल्याने तिने संपर्क तोडला. मात्र, भेटीदरम्यानच्या छायाचित्रावरून ब्लॅकमेल करत तब्बल पाच वर्षांनंतर तो तिच्या शहरातील होस्टेलपर्यंत पोहोचला. घाबरलेल्या तरुणीने दामिनी पथकाला कळवल्यानंतर सोमवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मूळ बीडची असलेली १७ वर्षीय रेखा (नाव बदलले आहे) शहरात पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेते. बीडला शालेय शिक्षण घेत असताना स्नॅपचॅटवरून तिची बारामतीच्या आकाश सोनवणेसोबत ओळख झाली होती. संवाद वाढत गेला. घरी असल्याने त्यांची भेट शक्य झाली नाही. मात्र, दहावीनंतर रेखाचे शिक्षणानिमित्त घराबाहेर पडणे सुरू झाले. तेव्हा दीड वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा भेटले. त्यानंतर रेखाला तो २९ वर्षांचा चालक असून त्याच्याविषयी सत्य परिस्थिती कळाल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. आकाशने वारंवार भेटण्यासाठी हट्ट सुरू केला. रेखाने प्रतिसाद देणे बंद केल्यानंतर भेटीत काढलेले छायाचित्र पाठवून ब्लॅकमेलिंग सुरू केले. रेखा कुठे शिकते, कुठे राहते, इथपर्यंत माहिती काढली. पाच दिवसांपासून त्याने रेखाला महाविद्यालयात, होस्टेलबाहेर भेटायला येत असल्याचे मेसेज पाठवणे सुरू केले होते.

विकृतीची हद्द, टॅटू काढण्याचा हट्टसोमवारी त्याने रेखाला कांचनवाडी उड्डाणपुलाखाली भेटण्यासाठी बोलावले. तू माझ्या हातावर चाव, मला तेथे टॅटू काढायचाय, असा हट्ट करण्यापर्यंत आकाशची मजल गेली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याची रेखाला जाणीव झाली. घरी कळू द्यायचे नव्हते. तिने दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना कळवले. मिरधे यांनी तिला भेटून प्रकार समजून घेतला. अंमलदार निर्मला निंभोरे, संगीता परळकर, अमृता भोपळे, प्रियांका भिवसने यांनी दुपारी सापळा रचला. रेखाने आकाशला भेटायला बोलावले. आकाश येताच साध्या वेशात दबा धरून बसलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पथकाने रेखाला देखील समजावून सांगितले. अजाणत्या वयात झालेल्या चुकीची जाणीव झाल्याने तिला रडू आवरत नव्हते. तिला धीर देऊन पोलिसांनी होस्टेलवर सोडले. आकाशवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम