औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ( Railway Station ) नातेवाईकांना सोडायला जाणे स्वस्त झाले असून, गुरुवारपासून (दि.७) रेल्वे प्लॅटफाॅर्म ( Platform Ticket ) तिकीट दर पुन्हा एकदा १० रुपये करण्यात आले आहेत.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर काेराेनापूर्वी प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी अवघे १० रुपये माेजावे लागत हाेते. मात्र, काेराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील गर्दी आटाेक्यात राहण्यासाठी देशभरातील रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना साेडण्यासाठी येणाऱ्यांना रेल्वेपर्यंत जाण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी ३० रुपये माेजावे लागत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकीट दर पुन्हा एकदा १० रुपये करण्यात आले. मात्र, औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील दर कमी हाेण्याची प्रतीक्षाच करावी लागत होती. अखेर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्व रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकीट दर गुरुवारपासून पूर्ववत १० रुपये करण्यात आले.
राेज सरासरी २५० ते ३०० तिकिटांची विक्रीकाेराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गतवर्षी रेल्वे बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या पॅसेंजर रेल्वे वगळता बहुतांश रेल्वे सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दरराेज सरासरी २५० ते ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री हाेते. वर्षभर प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी ३० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.