लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्पर्श हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाºया संस्थेच्या कार्यालयावर धाड मारून गुन्हे शाखा पोलिसांनी एका जणाला अटक केली. त्याच्याकडून बनावट पत्रके, बनावट नेमणूक प्रमाणपत्र, विविध बँकांचे धनादेश बुक, एटीएम कार्ड, मोबाइल, रोख रक्कम असा सुमारे १ लाख १५ हजार ७१० रुपयांचा ऐवज जप्त केला.दिलीप मंगरुस्वा गुप्ता (रा. रांची, झारखंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, आरोपीने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पर्श संस्थेला आरोग्य कामासाठी प्रत्येक पंचायतीसाठी सर्व्हेअर, तालुक्यामध्ये बीपीओ, नर्स, कम्पाऊंडर, लॅब टेक्निशियन अशी पदे भरायची आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात काम करणाºया बेरोजगार तरुणांना त्याने दहा ते तीस हजार रुपये वेतन देण्याचे आमिष जाहिरातीत दाखविले. विशेष म्हणजे आरोपीने काल्डा कॉर्नरवरील चेतनानगर येथील रुख्मिणी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर स्पर्श पब्लिक हेल्थ या नावाने कार्यालय उघडले होते. तेथे मॅनेजर, टेलिकॉलर, प्रोगामिंग आॅफिसर, आॅफिस बॉय, वॉचमन आणि स्टेनोग्राफर आदी पदांवर दहा कर्मचारी नेमले होते. ही जाहिरात वाचून अनेकांनी त्याच्याकडे नोकरीसाठी अर्ज दाखल केले. त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत प्रत्येकी एक हजार रुपये तो उकळत असल्याची माहिती खबºयाने गुन्हे शाखेला दिली.पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चौहान, भगवान शिलोटे, शेख हकीम, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, अय्युब पठाण, भावसिंग चव्हाण यांनी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी आरोपीच्या कार्यालयावर धाड मारली. यावेळी कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे आरोपीचे कामकाज सुरू होते.आरोपीची पोलिसांनी विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे कामकाज नियमानुसार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. तेथे बनावट पत्रके, बनावट नेमणूक प्रमाणपत्र, विविध बँकांचे धनादेश बुक, एटीएम कार्ड, मोबाइल, रोख रक्कम, लॅपटॉप आणि इतर साहित्य असा सुमारे १ लाख १५ हजार ७१० रुपये असा ऐवज जप्त केला.
हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीच्या आमिषाने गंडविणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:28 AM