शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बँके चे कर्ज काढण्याच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:06 AM

व्यवसायासाठी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून फसविणा-यास गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : व्यवसायासाठी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून फसविणा-यास गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी अटक केली.कैलास जयवंतराव शिंदे (३८, रा. तळपिंप्री, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी सामान्यांना कर्जाचे आमिष दाखवून लोन प्रोसेसिंग फीस आणि विविध कारणे सांगून पैसे उकळतो आणि गायब होतो, अशी माहिती खब-याने दिली. सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी, शेख हकीम आणि सय्यद अश्रफ यांनी त्याला बालाजीनगर परिसरात ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर पोलिसांनी तक्रारदारास त्याच्यासमोर उभा केले तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तक्रारदार राजू रामचंद्र परदेशी (रा. गुलमोहर कॉलनी) यांना चार महिन्यांपूर्वी तो भेटला. त्याने कर्ज काढून देतो, असे सांगितले. त्यासाठी प्रोसेसिंग फीस लागते, ती दिली तर तुम्हाला मोठे दुकान टाकता येईल, असे कर्ज काढून देण्याची ग्वाही त्याने दिली. यानंतर त्याने त्यांचे शॉप अ‍ॅक्ट लायसन्स काढून दिले. एसबीआय बँकेत खाते उघडून देऊन आधार कार्ड, पॅनकार्डची झेरॉक्स आणि कर्जाच्या प्रोसेसिंग फीसकरिता ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर तो पंधरा दिवस गायब झाला. काही दिवसांनी राजू यांनी आरोपीशी संपर्क साधला असता तुमची फाईल बँकेत टाकल्याचे सांगितले. यामुळे राजू यांचा आरोपीवर विश्वास बसला. त्यांनी त्यांच्या मामाचा मुलगा प्रेम लक्ष्मण परदेशी यांनाही कर्जाची गरज असल्याचे सांगितले. आरोपीने त्यांना पाच लाख रुपये कर्ज काढून देण्यासाठी फीस म्हणून १५ हजार रुपये उकळले. तर त्यांचा मित्र नितीन परमार यांनाही पाच लाख रुपये कर्जासाठी पैसे घेतले.नितीन यांचीही फाईल बँकेत टाकल्याचे सांगून आणखी १५ हजार रुपये घेतले. कर्ज मंजूर न झाल्याने राजू यांनी आरोपीकडे कर्जाविषयी विचारणा केली असता कर्ज मंजूर होण्यास वेळ लागेल. आज होईल, उद्या होईल असे तो सांगू लागला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या नावाची कर्ज फाईल बँकेत नसल्याचे समजले.