लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : कुळकायद्यातील जमिनीची प्लॉटिंग पाडून बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी शहरातील ८१ प्रतिष्ठितांवर बुधवारी रात्री उशिरा न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका वसाहतीच्या नागरिकांवर अवैध जमीन खरेदी-विक्री प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी घटना असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कागदपत्रांची तपासणी करुन न्यायालयाच्या आदेशाने अंकुशराव अंबादास उबाळे, रमेशचंद्र नंदलाल सोडाणी, सुभाष विक्रम चाटे, कृष्णा विनायकराव गोपाने, हेमा कैलास लाहोटी, सचिन अशोक जानवे, केशव बाबूराव आटकर, दिलीप बाबूराव देशमुख, रामेश्वर गंगाधन पोळेकर, विवेक पंडितराव पाटील, धनजंय शिवहरी मुळे, निरंजन जयनारायण दर्प, यशोदा सत्यनारायण बियाणी, कल्याण तुळशीराम काळे, कमलाकर अप्पादेव टोनपे, तुकाराम यलाजी गावडे, महेश रघुनाथ लबडे, चंद्रशेख कालीदास दर्प, शिवाजी मुरलीधर वैद्य, किशन शामराव खरात, दिवाकर सुमीरचंद सावजी, संदीप देविदास आंधळे, रोहिणी कारभारी नागरगोजे, सुशीला सुमीथनाथ भागवत, भगवान जगनाथा चोरमारे, अशोक श्रीपतराव जामधरे, दत्तात्रय दादाभाऊ शेळके, सुधाकर गंगाधर खोडे, कल्याण विश्वंभर शेळके, संजय रविदास झोटींग, रामप्रसाद श्रीराम कोल्हे, सुभाष किसनराव चाटे, दिनेश कस्तुरबा जैन, तुकाराम संपतराव जामधरे, रामेश्वर भाऊराव उढाण, संजय ज्ञानेश्वर देशपांडे, उषा रामचंद्र वाघमारे, रामेश्वर निवृत्ती काजळे, सूर्यकांत शांतीनाथ देशमाने, कैलास अंबादास ढोले, नंदाबाई गणेशलाल लाहोटी, विनोद बन्सीधर भाडमुखे, जगन्नाथ मन्नुराम चौधरी, सविता दिनेश जैन, नंदा सतिष भावले, संदीप शिवाजी शिंदे, परमेश्वर सुदाम शेळके, अंकुश बाबासाहेब दोरखे, प्रल्हादराव माणिकराव ढवळे, संतोष प्रल्हाद ढवळे, जयश्री अंगतराव भागवत, सुरेश नारायण क्षीरसागर, प्रल्हाद बाजीराव जाधव, रमेश मनोहर फटाले, नरेंद्र नारायण रत्नपारखी, मांगीलाल भुरा पवार, विनयकुमार लक्ष्मण आव्हाणे, शालिनी आजिनाथ शिरसाट, गीताराम वैजिनाथ मते, चैताली दिनेश जैन, विकास उध्दवराव आंधळे, बाबासाहेब हरिभाऊ आंधळे, सुखदेव लहानूजी पवार, भागवत तुकाराम गिऱ्हे, उमाशंकर एकनाथ वाघुंडे, अरविंद उत्तमराव देव, प्रतिभा अनिल खडके, अनिल श्रणिकराव खडके, वसंत यशवंतराव वाघ, वैशाली सुभाष वाघमारे, कैलास रामेश्वर लोहिया, दादासाहेब बापूराव जंगले, अर्जुन पाराजी निकम, कैलास भावसिंग राठोड, सुरेश ज्योतीराम देवळकर, जनार्धन लक्ष्मण तांबे, अंकुश भानुदास पवार, अशोक गणपत जानवे, महादेव शाहूराव ढाकणे, अनिल मारोती माळी अशा ८१ जणांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्लॉटिंगद्वारे फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:02 AM