शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

'प्राध्यापकांनो, आठ दिवसांत पाचशे उत्तरपत्रिका तपासा'; परीक्षा संचालकांचे आदेश

By राम शिनगारे | Published: January 03, 2024 2:24 PM

३० दिवसांत निकाल जाहीर करण्यासाठी उचलले पाऊल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी चार जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर दाखल झाल्या आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आठ दिवसांत किमान ५०० उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिले आहेत. त्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आवाहनही संचालकांनी केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार ३० दिवसांत निकाल जाहीर करावेत अशी तरतूद आहे. या तरतुदीचे पालन करणे विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय, अध्यापकांना बंधनकारक आहे. कुलपती व राज्य शासनाकडून वारंवार विद्यापीठांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्तिश: लक्ष घालून मूल्यांकनाच्या कामासाठी प्राध्यापकांनी ८ दिवस सहभाग नोंदवित स्वत:च्या विषयाच्या किमान ५०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. त्यासाठी प्राचार्यांनी प्राध्यापकांना मेसेज, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून कार्यमुक्त न करता महाविद्यालयाच्या लेटरहेडवर संबंधित प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे आणि त्या आदेशाची एक प्रत मूल्यांकन केंद्रात जमा करावी, असेही परीक्षा संचालक डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील जिल्ह्यातच मूल्यांकनजालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतर जिल्ह्यातील मूल्यांकन केंद्रांवर तपासण्यासाठी पाठविण्यात येत होत्या. मात्र, आता जालना जिल्ह्यातील उत्तरपत्रिका जालना जिल्ह्यात असलेल्या मूल्यांकन केंद्रांवर पाठविण्यात आल्याची माहिती आहे. एका प्राध्यापकाकडे तर त्याच्या महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा ही बाब उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चार जिल्ह्यात १५ मूल्यांकन केंद्रविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५, बीड ५, धाराशिव २ आणि जालना जिल्ह्यातील ३ मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहेत.

विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना कामाला लावाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी संबंधित प्राध्यापकांना प्राचार्यांनी अधिकृतपणे कार्यमुक्त केले पाहिजे. त्याचवेळी परीक्षा विभागाने विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही हाच नियम लागू करावा आणि त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेतले पाहिजे.- डॉ. रविकिरण सावंत, सदस्य, व्यवस्थापन परिषद, प्राध्यापक गट

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण