शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

केमेस्ट्रीच्या उत्तरपत्रिका थातूरमातूर तपासून केले गुणदान; बोर्डात गंभीर प्रकार उघडकीस

By राम शिनगारे | Published: May 02, 2024 8:08 PM

विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा प्रताप

छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयाच्या ४ हजार २०० उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून तपासणी झालेल्या नसल्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तत्काळ परत मागविल्या. या उत्तरपत्रिका युद्धपातळीवर शहरातील केमेस्ट्रीच्या मॉडरेटर शिक्षकांकडून तपासून घेण्यात आल्या. त्यात शेकडो उत्तरपत्रिका थातूरमातूर तपासूनच गुणदान केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरपत्रिका मंडळात मॉडरेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान टळल्याची माहिती तपासणी करणाऱ्या शिक्षकांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान ४४९ केंद्रांवर घेण्यात आल्या आहेत. या परीक्षांना १ लाख ७९ हजार १४ विद्यार्थी बसले होते. पहिला पेपर झाल्यानंतर त्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिका तपासण्यासाठी संबंधित विषयांच्या प्राध्यापक, शिक्षकांकडे पाठविण्यात येत होत्या. सहा शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची एका मॉडरेटरकडून तपासणी केली जाते. एका मॉडरेटरच्या अंतर्गत सहा शिक्षक असतात. मॉडरेटरांना १८ एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा करण्याचे आदेश होते. त्यानुसार १९ एप्रिल रोजी मंडळाच्या सचिवांनी उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला. तेव्हा रसायनशास्त्र विषयाच्या जवळपास ४ हजार २०० उत्तरपत्रिका मंडळात पोहोचलेल्याच नव्हत्या. त्यामुळे मंडळाने तपासणी झालेल्या व न झालेल्या सर्व संबंधित उत्तरपत्रिका जमा करून मंडळात आणल्या.

मंडळात २० ते २५ एप्रिलदरम्यान विशेष ड्राईव्ह घेत ज्या उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या होत्या, त्या मॉडरेटरकडून तपासून घेतल्या, तर ज्या उत्तरपत्रिकांची प्राथमिक पातळीवरच तपासणी बाकी होती. त्यांचे मूल्यांकनही शिक्षकांकडून घेण्यात आले. मॉडरेट करण्यात आलेल्या शेकडो उत्तरपत्रिका थातूरमातूर तपासून गुण देण्यात आले होते. काही प्रश्नांची उत्तरे चुकीची असतानाही गुण देण्यात आल्याचे प्रकार मॉडरेटरच्या निदर्शनास आल्यामुळे अनेकांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. एका प्राध्यापकांकडून अंदाजे १०० पेक्षा अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी मंडळाने करून घेतली आहे. ज्या ठिकाणाहून या उत्तरपत्रिका मंडळात आणण्यात आल्या. त्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये ही विनाअनुदानित असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

बारावीचे काम पूर्ण, दहावी ९० टक्केबारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. बारावीच्या उत्तरपत्रिकांची संख्या ही १० लाख ३१ हजार २६३ एवढी होती. या संपूर्ण उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची संख्या ही १६ लाख ५७ हजार ३३७ एवढी आहे. त्यापैकी ९० टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव वैशाली जामदार यांनी सांगितले.

नोटीस बजावण्यात येणारमंडळाने उत्तरपत्रिकांची तपासणी करून जमा करण्यासाठी १८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. त्या मुदतीत न जमा झालेल्या उत्तरपत्रिका मंडळात मागविण्यात आल्या. त्यातील काही उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून तपासणी होणे बाकी होते. त्यात रसायनशास्त्र विषयाच्या ४ हजार २०० उत्तरपत्रिकांचा समावेश होता. शहरातील शिक्षकांनी सहकार्य केल्यामुळे संबंधित उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून तपासून घेतल्या आहेत. ज्यांनी कामात दिरंगाई केली, त्या संबंधितांना नोटिसा देण्यात येणार आहेत.- वैशाली जामदार, सचिव, विभागीय मंडळ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाHSC Exam Resultबारावी निकाल