शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

छत्रपती संभाजीनगर बनू शकते ‘कॅरी ॲण्ड फॉरवर्डिंग’ हब; व्यापाऱ्यांचे थेट दिल्लीतून प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:53 PM

छत्रपती संभाजीनगर राज्यात मध्यवर्ती ठिकाणी; बड्या कंपन्यांच्या गुंतवणुकीने शहरात पुन्हा औद्योगिक क्रांती अन् 'समृद्धी'ची कनेक्टीव्हिटी ठरतेय फायद्याची

छत्रपती संभाजीनगर : शहराला लागून जाणारा समृद्धी महामार्ग ‘इकाॅनॉमिक कॉरिडोर’ बनला आहे. मुंबई व नागपूर शहराचा केंद्रबिंदू आता छत्रपती संभाजीनगर ठरत आहे. यामुळे भौगोलिक स्तरावरही हे शहर आणखी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अंतर कमी झाल्याने औद्योगिक वसाहतीतील उत्पादने काही तासांत कुठेही पोहोचू शकतात. याचा फायदा शेंद्रा-बिडकीन-वाळूज येथील उद्योगांनाच नव्हे, तर गुजरात-मध्य प्रदेशापर्यंत होऊ शकतो. यासाठी शहरालगतच्या माळीवाड्यात ‘सी ॲण्ड एफ हब’ (कॅरी ॲण्ड फॉरवर्डिंग) उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या वतीने थेट दिल्लीतून यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बड्या कंपन्यांच्या गुंतवणुकीने शहरात पुन्हा औद्योगिक क्रांतीदिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आलेल्या टोयोटो-किर्लोस्कर, एथर एनर्जी, लुब्रिझोल या कंपन्यांची एकापाठोपाठ गुंतवणूक करीत जमीन घेतली. नुकतेच जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनीने ऑरिक सिटीत गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला. यामुळे उद्योग जगतात छत्रपती संभाजीनगरचे महत्त्व वाढले आहे.

सी ॲण्ड एफ हब कशासाठी?छत्रपती संभाजीनगर शहर महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील डीएमआयसी, रेल्वे, विमान कनेक्टिव्हिटीसह महामार्गाचे जाळे वाढले आहे. मुंबई-नागपूरच नव्हे, तर पश्चिम भारतातील गुजरात, मध्य प्रदेशात कमी वेळेत पोहोचता येते. येथे कंपन्यांसाठी लागणारा कच्चा माल साठवणूक व वितरणाचे ‘कॅरी ॲण्ड फॉरवर्डिंग’ (सी ॲण्ड एफ) हब झाले तर उद्योग व व्यापाराला मोठी गती मिळेल.

माळीवाडाच का ?शहरातून दोन नॅशनल हायवे जातात. शहराच्या उत्तर बाजूने जाणारा समृद्धी महामार्ग व दक्षिण बाजूच्या सोलापूर-धुळे महामार्गामुळे रस्ता मालवाहतुकीला वेग आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही महामार्ग याच माळीवाडा परिसरातून जातात. माळीवाडा येथे कंटेनर डेपो आहे. यामुळे ‘सी ॲण्ड एफ’ हबसाठी माळीवाडाच योग्य ठिकाण आहे.

जमिनीची उपलब्धतामुंबई, पुणे, नागपूर, इंदूर, अहमदाबादपेक्षा शहरात जमिनीची उपलब्धता मोठी आहे. जमिनीच्या किमती त्या तुलनेत कमी आहेत. दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक उद्योगांना व होलसेल व्यापाऱ्यांना मोठी बाजारपेठ बनविण्यासाठी हे शहर उपयुक्त ठरणार आहे. कंपन्यांनाही आपल्या उत्पादनाचा येथे साठा करून वितरण करणे सोपे जाणार आहे.

शहराच्या जमेच्या बाजूऑटोमोबाईल हब, फार्मास्युटिकल हब, बीअर हब येथे आहे. डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा, बिडकीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत, जालना येथील स्टील व सीडस् हब, ड्रायपोर्ट हे येथील औद्योगिक क्षमता दर्शविते.

नव्याने प्रस्ताव पाठविलामाळीवाड्यात सी ॲण्ड एफ हब झाले तर मराठवाड्याच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. कॅट संघटनेचे राष्ट्रीय महासचिव व दिल्ली येथील खा. प्रवीण खंडेलवाल हे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालय संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. नव्याने प्रस्तावही पाठविला आहे.- अजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMIDCएमआयडीसी