छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागातील बदल्यांमधील आरोप प्रत्यारोपांनंतर अखेर सोमवारी पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांची यादी जारी झाली. त्यात प्रामुख्याने शहरातील ७ पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या तर शहरात बाहेरील जिल्ह्यातून एकाच वेळी नवे १२ पोलिस निरीक्षक येथे बदलून येणार आहेत.
शहरचे हे सात अधिकारी बाहेरील जिल्ह्यातअशोक गिरी - नाशिक शहरअविनाश आघाव - पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालनागीता बागवडे - पुणे शहरदिलीप गांगुर्डे -पुणे शहरआम्रपाली तायडे - नाशिक शहरगणेश ताठे - नाशिक शहरसुशील जुमडे - नाशिक शहर
हे १२ अधिकारी शहर पोलिस दलात रूजू होतीलसंतोष कसबे : (पिंपरी-चिंचवड)संदीप भोसले : (पुणे शहर)दादासाहेब चुडाप्पा (पुणे शहर)सुनील माने (पुणे शहर)राजेंद्र सहाणे (पुणे शहर)सूरज बंडगर (पुणे शहर)मंगेश जगताप (पुणे शहर)जयवंत राजूरकर (पुणे शहर)सोमनाथ जाधव ( पुणे शहर)गजानन कल्याणकर ( नागपूर शहर )तुषार आढाव (नाशिक )पवन चौधरी ( नाशिक )
२७ उपनिरीक्षक बाहेरशहर पोलिस दलातील २७ पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या तर २४ उपनिरीक्षकांच्या बदल्या शहरात झाल्या आहेत तर दोन सहायक निरीक्षक बदलून दोन सहायक निरीक्षक मिळाले आहेत.
व्यंकटेश केंद्रे विशेष सुरक्षेलाशहरांतर्गत जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांची विशेष सुरक्षा विभागाच्या प्रभारीपदी बदली झाली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचा पदभार कृष्णा शिंदे यांना देण्यात आला आहे. नवे १२ पाेलिस निरीक्षक रूजू झाल्यानंतर शहरातील शाखा व ठाण्यांच्या प्रभारी पदावर नव्याने नियुक्त्या होतील.