छत्रपती संभाजीनगर : कृषी विभाग व ‘स्कायमेट’च्या संलग्नतेने २०१६-१७ मध्ये स्वयंचलित हवामान केंद्राचा ‘महावेध’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुमारे १३७२ गावांसाठी या प्रकल्पांतर्गत ८४ पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. बिल्ड, ओन, ऑपरेट या तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पातील पर्जन्यमापकांच्या आधारेच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पावसाची मोजदाद केली जात आहे.
‘महावेध’ प्रकल्पराज्यातील सर्व महसूल मंडळ स्तरांवर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा व हवामानविषयी घटकांची दैनंदिन माहिती करण्यासाठी महावेध प्रकल्प हाती घेण्यात आला.
इतके पर्जन्यमापक बसवले, इतके बसवणारया प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात आजवर ८४ पर्जन्यमापक यंत्रे बसविली आहेत. आगामी काळात यामध्ये वाढ होणार असून त्यासाठी कृषी, स्कायमेटची यंत्रणा काम करीत आहे.
‘स्कायमेट’ संस्था काय करते?स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि.ही संस्था हवामानाच्या बदलांशी निगडित माहिती देणारी संस्था आहे. ‘महावेध’साठी ही संस्था सेवापुरवठादार म्हणून काम करीत आहे.
पारंपरिक पर्जन्यमापकाची अचूकता कमीचमहावेध प्रकल्पातील स्वयंचलित पर्जन्यमापकापेक्षा पारंपरिक पर्जन्यमापकाची अचूकता कमीच आहे. महावेधचे पर्जन्यमापक यंत्र सात वर्षांनंतर शासनाच्या ताब्यात देण्याचा करार आहे.
स्वयंचलित पर्जन्यमापक असे करते काम....स्वयंचलित पर्जन्यमापकाद्वारे किती पाऊस पडला. याच्या नोंदी घेतल्या जातात. यातही पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते. या उपकरणाद्वारे पावसाचे प्रमाण आणि त्याच्या कालावधीची नोंद एकाच वेळी होते.
कशासाठी हवे पर्जन्यमापक?पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक लागते.
पर्जन्यमापकांमुळे डेटा रोज मिळतो...‘महावेध’ प्रकल्पातील स्वयंचलित पर्जन्यमापकांमुळेच पावसाचा डेटा रोज मिळतो आहे. जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळांत पर्जन्यमापक कार्यान्वित आहेत.-मारोजी म्हस्के, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी