शहरं
Join us  
Trending Stories
1
१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर
2
केंद्राकडून संवेदनशील सूचना, तीन मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या शिफारशीमध्ये मोठा बदल
3
...तर 'या' दिवशी केजरीवाल सरकारी बंगला रिकामा करतील, सुरक्षाही घेणार नाहीत, संजय सिंहांनी दिली संपूर्ण माहिती
4
Team India चा पुढचा ट्वेंटी-२० कर्णधार कोण असेल? रैनाच्या उत्तरानं उंचावल्या भुवया
5
बांगलादेश होणार मालामाल, आधी अमेरिका मग जागतिक बँक देणार २ अब्ज डॉलर्सची मदत
6
तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..."
7
पितृपक्ष: दत्तगुरु उपासनेने लाभ, पितृदोषावर ‘हा’ मंत्र अत्यंत प्रभावी; जप करा, कृपा मिळवा
8
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
9
२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण?
10
Modi Familyच्या वादावर अखेर तोडगा निघाला! आईचं भावनिक वक्तव्य; म्हणाल्या, "वडिलांचा वारसा..."
11
किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं
12
पितृपक्ष: प्रारंभी चंद्रग्रहण, समाप्तीला सूर्यग्रहण; ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना खडतर काळ!
13
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
14
अंत्यसंस्कारासाठी एक मिनिटही नव्हतं का?; कामाच्या ताणामुळे मुलीचा मृत्यू, आईने कंपनीला लिहीलं पत्र
15
गणपतीला अर्पण केलेला लाडू १ कोटी ८७ लाखांना विकला; दरवर्षी होतो लिलाव
16
हिजबुल्लाहसाठी पेजर बनवणारी तैवानी कंपनीचा खुलासा; युरोपियन कनेक्शन जोडले
17
महागड्या रिचार्जपासून होणार सुटका! सरकार ५ कोटी Wi-Fi हॉटस्पॉट बसवणार, स्वस्तात मस्त Unlimited इंटरनेट मिळणार!
18
Reliance Jio चा धमाका; Jio 91 Recharge मध्ये संपूर्ण महिन्यासाठी मिळणार Unlimited Calling, Data
19
'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..."
20
PItru paksha 2024: एरव्ही न केली जाणारी आमसुलाची चटणी श्राद्धाच्या नैवेद्याचा मुख्य जीवच; वाचा कृती!

बाळाचे बारसे करून पुण्याला निघाले अन्...; 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह'ने घेतला चौघांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:14 AM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजजवळील पथकर नाक्यावर कार व जीपचा भीषण अपघात झाला. मद्यपान करून गाडी चालवताना नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर धडकली. 

वाळूज महानगर : लग्नानंतर दहा वर्षांनी घरात पाळणा हलला. बाळाचे बारसे करून कुटुंब आनंदात पुण्याला निघाले, पण वाटेतच अपरित घडले. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या अक्षम्य चुकीमुळे चौघांना जीव गमवावा लागला. हा भीषण अपघात शुक्रवार (१३) सायंकाळी ४ वाजता वाळूजजवळील पथकर नाक्याजवळ घडला.

अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणारी भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर धडकल्याने गंभीर जखमी तीन महिला व एका ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Drunk and Drive Accident : अपघात कसा घडला? अजय अंबादास बेसरकर (४०) हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या पुण्यात स्थायिक झाले आहेत. शुक्रवारी ते पत्नी मृणालिनी, ६ महिन्यांचा चिमुकला, सासू आशा पोपळघट (६५), मेव्हणी शुभांगिनी सागर गिते (३५) व मेव्हणीची मुलगी दुर्गा सागर गिते (७) यांच्यासह कारने (एमएच २७ बीझेड ००४५) संभाजीनगरमार्गे पुण्याला जात होते. 

वाळूजजवळील शिवराई पथकर नाक्याजवळ सायंकाळी ४ वाजता अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव जाणाऱ्या स्कार्पिओ जीपच्या (एमएच १२ केजे ४१३४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या बेदरकर यांच्या कारवर जाऊन धडकली. 

कारमधील चालक, दोन महिला व दोन लहान मुले गंभीर जखमी होऊन अडकून पडली. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत वाळूज पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

स्कॉर्पिओ चालकासह दोघे फरार

मृणालिनी, आशालता, दुर्गा सागर गिते व एका चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अजय, शुभागिनी हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर जीपचा चालक व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी दोघांनाही केली अटक

दरम्यान, पोलिसांनी फरार झालेल्या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. विशाल ऊर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२, रा. बकवाल नगर वाळूज, ता. गंगापूर), कृष्णा कारभारी केरे (वय १९, बकवाल नगर वाळूज) अशी आरोपींची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव चव्हाण हा चालक होता. पण, त्याने लायसन्स नसताना आणि मद्यपान केलेल्या कृष्णा केरे याला गाडी चालवायला दिली. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPoliceपोलिसPuneपुणे