शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिराच्या जागेत १९०० चौ. फुटांची भर

By प्रशांत तेलवाडकर | Published: July 18, 2024 3:24 PM

पुढील दोन वर्षात उभारणार ग्रामदैवताचे दोन मजली भव्य मंदिर

छत्रपती संभाजीनगर : शहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिराची जागा मागील चार वर्षात वाढली, हा काही चमत्कार नव्हे. विश्वस्त मंडळाने मंदिरासाठी आजूबाजूची १९०० चौ.फूट जागा खरेदी केली आहे. आणखी जागा खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या दोन वर्षात दोन मजली मंदिर उभारण्याचा मानस विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धाराला ३९ वर्षे पूर्णशहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती ३५० वर्षे जुने आहे. येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्व महान नेत्यांनी येऊन गणपतीचे दर्शन घेतले. १९८४-१९८५ यावर्षी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बजरंगलाल शर्मा हे असताना मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. ३५० चौ. फुटांचे हे संपूर्ण मंदिर संगमरवरी करण्यात आले. यास आता ३९ वर्षे पूर्ण होत आहेत.

जागेची भरसध्या मंदिरात एकाच वेळी १० भाविकही उभे राहू शकत नाहीत. जागा अपुरी पडत असल्याने विश्वस्तांनी मंदिराच्या दक्षिण व पश्चिम बाजूची जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये दक्षिण बाजूची १२०० चौ. फूट जागा विकत घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी आणखी ७०० चौ. फूट जागा मंदिराला विकत मिळाली. अशी १९०० चौ.फूट जागा व मूळची ३५० चौ. फूट जागा अशी सुमारे २२५० चौ.फूट जागा आहे.

उभारणार भव्य मंदिरपश्चिम बाजूच्या कोपऱ्यातील आणखी ७०० चौ.फूट जागा खरेदीचा विश्वस्तांचा प्रयत्न सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे निर्णय लांबत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यास वर्षाच्या आत मंदिराकडे २९५० चौ.फुटांची जागा असेल.

उभारणार २ मजली मंदिरग्रामदैवत संस्थान गणपती मंदिराचा आकार वाढावा यासाठी छत्रपती संभाजीनगरातील भाविकांची इच्छा आहे. आणखी ७०० चौ. फूट जागा मिळाल्यावर दोन मजली भव्य मंदिर उभारण्याचे काम लगेच सुरू करण्यात येईल. खालील बाजूस मंदिर व वरील मजल्यावर मोठा हॉल व विश्वस्त कार्यालय असेल.- प्रफुुल्ल मालाणी, सचिव, संस्थान गणपती मंदिर, ट्रस्ट.

वज्रलेपनातून दिसले मूर्तीचे १०० वर्षांपूर्वीचे मूळ रूप२०२२ या वर्षी संस्थान गणपतीचे वज्रलेपन करण्यात आले. जेव्हा शेंदराचा थर काढण्यात आला. तेव्हा १०० वर्षांपूर्वीचे मूर्तीचे मूळ रूप समोर आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका